For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार हलगेकरांच्या हस्ते रस्त्यांचे पूजन

11:14 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आमदार हलगेकरांच्या हस्ते रस्त्यांचे पूजन
Advertisement

खानापूर : आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते तालुक्यातील विविध रस्त्यांचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी 24 कोटी 40 लाख रु. चा निधी मंजूर झाला आहे. यात खानापूर-हेम्माडगा रस्त्यासाठी 1 कोटी 53 लाख तर खानापूर-नंदगड रस्त्यासाठी 10 कोटी, यडोगा ते हडलगा 1 कोटी 85 लाख, खानापूर शहरातील राजा छत्रपती चौक ते रेल्वेस्टेशन 80 लाख, पारिश्वाड ते कटकोळ रस्त्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्यांच्या निविदांचे काम पूर्ण झाल्याने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Advertisement

खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरील शेडेगाळी क्रॉस ते हारुरीपर्यंतच्या 800 मीटर रस्त्यासाठी 1 कोटी 53 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन शेडेगाळी येथे करण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा अध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप, मऱ्याप्पा पाटील, गणपती गुरव, मल्लाप्पा मारिहाळ, सदानंद मासेकर, गुंडू तोपिनकट्टी, आबासाहेब दळवी, बाळाराम  शेलार, शंकर पाटील, अप्पय्या कोडोळीसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.