महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खानापुरात न्यायाधीशांच्या निवासी संकुलाचे भूमिपूजन

10:29 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न्यायमूर्तीच्या हस्ते पूजन : आशिलाना योग्य मार्गदर्शन करून लवकरात लवकर न्याय मिळवून द्या

Advertisement

खानापूर : देशातील न्यायालयाचे स्वरुप बदलले असून आज तरुण होतकरु वकील दिसत आहेत. या वकिलानी अभ्यास आणि कष्टाची सवय ठेवावी, आशिलाना योग्य मार्गदर्शन करून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा,आशिलाशी प्रामाणिक राहून यांना वेळेत न्याय दिल्यास न्याय व्यवस्थेवरचा विश्वास नक्कीच बळकट होईल, असे प्रतिपादन कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश दिनेश कुमार यांनी  येथील न्यायालय आवारात नव्याने बांधण्यात येणाऱ्या न्यायाधिशांच्या निवासी संतुलाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केले. वकील संघटना, सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या संयुक्त विद्यमाने भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजिला होता. न्यायमूर्ती दिनेश कुमार, पत्नी जयश्री यांच्या हस्ते पूजन केले. त्यानंतर भूमिपूजन झाले. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश विजयालक्ष्मी, जिल्हा न्याय समितीचे सचिव मुरलीमनोहर रे•ाr, खानापूर न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीश श्रीमती झरिना, दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यनारायण, अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश विरेश हिरेमठ व खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. स्वागत, प्रास्ताविक चेतन मणेरीकर यांनी केले. यावेळी न्यायाधीशांचा खानापूर वकील संघटनेतर्फे गौरव केला. खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांच्यासह संपूर्ण वकील संघटनेचे कौतुक केले. याप्रसंगी पोलिसांनी न्यायाधीशांना मानवंदना दिली. यावेळी ज्येष्ठ वकील एच. एन. देसाई, व्ही, एम. पाटील, अनिल लोकरे, केशव कळ्ळेकर, सादीक नंदगडी, अरुण सरदेसाई, आर. वाय. पाटींलसह पोलीस उपअधीक्षक रवि नायक, खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, वनखात्याचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

संकुलनासाठी 1 कोटीचा निधी मंजूर

या निवासी संकुलनासाठी 1 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यातून अतिरिक्त न्यायाधीशांच्या निवासासाठी ही इमारत बांधण्यात येणार आहे. यावेळी इमारतीचे बांधकाम योग्य पद्धतीने करण्यात यावे, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वनखात्याच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांना रोपांचे भेट देऊन स्वागत करण्यात आले. वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी सर्वांचे आभार मानले.

न्यायाधीशांची मराठीतून भाषणाला सुरवात

न्यायाधीश दिनेश कुमार यांनी आपल्या भाषणाची सुरवात मराठीतून करत, मला मराठी कळते पण बोलायला येत नाही. असे सांगितले. तसेच धारवाड, बेळगाव परिसराच्या प्रेमात पडलो असून येथील निसर्ग मला कायमच साद घालत आहे. यासाठी निवृत्तीनंतरचे जीवन या भागात व्यतीत करण्याचा मानस आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article