For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भीमा नदीचा रुद्रावतार, हजारो एकर शेती पाण्याखाली

11:15 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
भीमा नदीचा रुद्रावतार  हजारो एकर शेती पाण्याखाली
Advertisement

महाराष्ट्र-कर्नाटक मार्गावरील वाहतूक ठप्प

Advertisement

वार्ताहर/विजापूर

महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. नदी आता धोकापातळी ओलांडून वाहत आहे. महाराष्ट्रातील उजनी, सेना आणि वीर धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या या रुद्रावतारामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी शेतकऱ्यातून चिंता व्यक्त होत आहे. तसेच पुलांवर पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारक चिंतेत आहेत.

Advertisement

भीमा नदीवरील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण 9 बंधाऱ्यांवर पाण्याचा प्रवाह धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबळी गावाजवळील सेना नदीवरील पूल पूर्णत: पाण्याखाली गेला आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्गावर पाणी शिरल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक दळणवळण पूर्णत: खंडित झाले आहे.

सेना, उजनी व वीर धरणांमधून एकत्रितपणे 2.5 लाख क्युसेकपेक्षा अधिक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे सेना नदीच्या महापुरामुळे महाराष्ट्रातील अनेक गावे संकटात सापडली आहेत. विजापूर जिह्यातील इंडी तालुक्यातील हिंगणी बंधाऱ्यापासून काही गावांमध्ये पुराची शक्यता असून प्रशासन सतर्क आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. भीमा नदीच्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील नदीकिनाऱ्यावरील हजारो एकर शेतीतील ऊस, तूर, कापूस, केळी इ. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक आमदार व अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली आहे.

Advertisement
Tags :

.