For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाऊसाहेब, शशिकलाताईंना गोवा विकासाचा ध्यास

12:33 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाऊसाहेब  शशिकलाताईंना गोवा विकासाचा ध्यास
Advertisement

खासदार सदानंद शेट तानावडे : गोमंतक मराठा समाज संस्थेतर्फे महिलांचा सत्कार

Advertisement

पणजी : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोमंतक मराठा समाजाला सन्मान मिळवून दिला. भाऊसाहेब आणि त्यांच्या कन्या तथा गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी गोव्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा ध्यास होता, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले. गोमंतक मराठा समाज संस्थेतर्फे गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या येथील राजाराम सभागृहात आयोजित केलेल्या यशस्वीनी महिलांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार तानावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. सुभाष वेलिंगकर,  ताईंचे सुपूत्र यतीन काकोडकर, सन्माननीय पाहुणे गोमंतक मराठा समाज मुंबई संस्थेचे सचिव राजेश रामनाथकर, संस्थेच्या प्रभारी अध्यक्षा दीपाली बाणास्तारकर, सचिव उत्कर्षा बाणास्तारकर, सहसचिव मृणाल लोलयेकर, खजिनदार जितेंद्र शिरगावकर उपस्थित होते. कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हा वारसा कमी लोकांत असतो तो भाऊसाहेब बांदोडकर व शशिकलाताई काकोडकर या पितापुत्रित होता. त्या दोघांनी एकाच ध्येयाने कार्य केले. राजकारणाचे पावित्र्य आणि नैतिकता त्यांनी जपली.   साक्षरतेचा स्तर ताईंनी वर आणला. गोवा शालांत मंडळाची स्थापना केली त्या शशिकलाताईंचे नाव या मंडळाच्या वस्तूला देण्यासाठी तसेच गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अत्यंत दुर्लक्षित समाधीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सदानंद तानावडे यांनी प्रयत्नशील राहावे, अशी मागणी प्राचार्य वेलिंगकर यांना केली.

ताईंनी समाजकल्याण खात्यांतर्गत महिलांच्या उत्कर्षासाठी अनेक निर्णय घेतले. भाऊंप्रमाणे त्या भ्रष्टाचाराविऊद्ध होत्या. गावडा समाजातील महिलांसाठी त्यांनी विशेष योगदान दिले. शिक्षणमंत्री यानात्याने शिक्षणाचा प्रसार केला. कुळकार मुंडकारांना हक्क मिळवून दिला. मराठी राज्यभाषा,माध्यमाची भाषा चळवळीत त्यांनी झोकून दिले. असे  यतीन काकोडकर यांनी नमूद केले आहे. यावेळी राजकीय क्षेत्रात योगदान दिलेल्या  सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य, नगरसेविका, नगराध्यक्षा जिल्हा पंचायत अध्यक्षा, सदस्या अशा 80 महिलांचा पाहुण्यांहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जीवनावर 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या राज्यस्तरीय  निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी ज.य. रेडकर यांच्या ‘चिमणीचे घर व इतर कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दीपाली बाणास्तरकर यांनी स्वागत केले. सुफल मांद्रेकर, दिव्या देविदास यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. मान्यवरांनी समई प्रज्वलित करून शशिकलाताईंच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.  श्रुती हजारे यांनी सूत्रसंचालन केले. मृणाल लोलयेकर यांनी आभार मानले.

Advertisement

आरक्षणचा लाभ महिलांना मिळणार: तानावडे

भाऊसाहेब आणि शशिकला काकोडकर या दोघांचेही गोव्याच्या विकासात मोठे योगदान आहे.  शशिकला काकोडकर यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या हॉस्टेलमध्ये केवळ गोमंतक मराठा समाजाच्याच नव्हे, तर सर्वच समाजाच्या गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. शशिकला काकोडकर यांनी नेहमीच महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या योजनांचा गोमंतक मराठा समाजासह इतर समाजाच्या महिलांनाही मोठा फायदा मिळेल. महिला सक्षमीकरणासाठीच केंद्र सरकारने संसदेत महिला आरक्षण मंजूर करून घेतले आहे. त्याचा मोठा लाभ देशभरातील महिलांना मिळणार असे सदानंद शेट तानावडे म्हणाले.

Advertisement
Tags :

.