वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाऊराव काकतकर महाविद्यालयाला यश
बेळगाव : बेळगाव येथे राणी चन्नम्मा विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाऊराव काकतकर विद्यालयाच्या खेळाडूंनी 2 सुवर्ण, 4 रौप्य व 1 कास्यपदकासह घवघवीत यश संपादन केले आहे. ऋतिका बांडगीची अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नेहरुनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेत यश संपादन केले. त्यामध्ये ऋतिका बांडगीने 59 किलो वजनी गटात सुवर्ण, वैष्णवी लोहारने 55 किलो वजनी गटात सुवर्ण, ज्योती चौगुलेने 64 किलो वजनी गटात रौप्य, सानिका बेळगुंदकरने 71 किलो वजनी गटात रौप्य, भक्ती कोकितकरने 59 किलो वजनी गटात रौप्य, नम्रता पाटीलने 55 किलो वजनी गटात रौप्य, कोमल पाटीलने 64 किलो वजनी गटात कास्यपदक पटकाविले. ऋतिका बांडगी हिची अखिल भारतीय आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत महिला गटात भाऊराव काकतकर महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. या सर्वांना प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, प्रा. ए. एस. पाटील, क्रीडानिर्देशक सुरज पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.