भाटे वॉरियर्स, साईराज वॉरियर्स यांचा विजय
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून भाटे वॉरियर्सने इंडियन बॉईज हिंडलगाचा व साईराज वॉरियर्सने साई फार्म स्पोर्ट्सचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. ऋतुराज (भाटे वॉरियर्स), भाटे नंदकुमार मलतवाडकर (साईराज) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिला सामन्यात भाटे वॉरियर्स संघाने इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा 5 गड्याने पराभव केला. इंडियन बॉईज हिंडलगा संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 124 धावा केल्या. त्यात परीक्षित उकुंडीने 4 चौकारांसह 35, सुमित करगावकरने 26, मॅथ्यू एन.ने 24 धावा केल्या. भाटे वॉरियर्स तर्फे ऋतुराज भाटेने 15 धावांत 3 तर रोहित पाटील, हार्दिक ओझा, भरत गडेकर व वैष्णव संगमित्रा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भाटे वॉरियर्स संघाने 16.5 षटकात 5 गडी बाद 127 धावा जमवत सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात माजिद मकानदारने 44, वैष्णव संगमित्राने 28, नागेंद्र पाटीलने 27, रोहित पाटीलने 17 धावा केल्या. त्यात इंडियन बॉइज तर्फे अधोक्षज मानवी व श्रेयश मतीवडर यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले.