For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाटे वॉरियर्स, साईराज वॉरियर्स यांचा विजय

10:05 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाटे वॉरियर्स  साईराज वॉरियर्स यांचा विजय
Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून भाटे वॉरियर्सने इंडियन बॉईज हिंडलगाचा व साईराज वॉरियर्सने साई फार्म स्पोर्ट्सचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. ऋतुराज (भाटे वॉरियर्स), भाटे नंदकुमार मलतवाडकर (साईराज) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिला सामन्यात भाटे वॉरियर्स संघाने इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा 5 गड्याने पराभव केला. इंडियन बॉईज हिंडलगा संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 124 धावा केल्या. त्यात परीक्षित उकुंडीने 4 चौकारांसह 35, सुमित करगावकरने 26, मॅथ्यू एन.ने 24 धावा केल्या. भाटे वॉरियर्स तर्फे ऋतुराज भाटेने 15 धावांत 3 तर रोहित पाटील, हार्दिक ओझा, भरत गडेकर व वैष्णव संगमित्रा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भाटे वॉरियर्स संघाने 16.5 षटकात 5 गडी बाद 127 धावा जमवत सामना  5 गड्यांनी जिंकला. त्यात  माजिद मकानदारने 44, वैष्णव संगमित्राने 28, नागेंद्र पाटीलने 27, रोहित पाटीलने 17 धावा केल्या. त्यात इंडियन बॉइज तर्फे अधोक्षज मानवी व श्रेयश मतीवडर यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत साईराज वॉरियर्स संघाने साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाचा सहा धावांनी पराभव केला. साईराज वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडीबाद 163 धावा केल्या. त्यात सुधन्वा कुलकर्णीने 2 ष्टकार 4 चौकारांसह 47, केदारनाथ उसूलकरने 24, राहुल शिंदेने 20 धावा केल्या. साई फार्म तर्फे अमर काळे, आर्यन उपाध्ये व रामलिंग पाटील यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 20 षटकात 9 गडीबाद 157 धावा केल्या. त्यात वैभव कुरीभावीने सर्वाधिक 4 षटकारांसह 57, शतक गुंजाळ व मिलिंद चव्हाण यांनी प्रत्येकी 22,अमर घाळेने 18 धावा केल्या. साईराज तर्फे नंदकुमार मलतवाडकर 22 धावांत 3 तर रब्बानी दफेदारने  16 धावांत 2 गडी बाद केले. सामन्यगनंतर सामनावीर प्रमुख पाहुणे वैभव कडांगले सचिन साळुंखे व गजानन जैनोजी यांच्या हस्ते सामनावीर ऋतुराज भाटे व इम्पॅक्ट खेळाडू सुमित करगावकर यांना तर दुसऱ्या सामन्यात  प्रमुख पाहुणे रोहित पोरवाल, संजय मोरे, महेश फगरे यांच्या हस्ते सामनावीर नंदकुमार मलतवाडकर व इम्पॅक्ट खेळाडू वैभव कुरीबागी यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.