For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

भारती हेक्साकॉमचा येणार आयपीओ

06:30 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारती हेक्साकॉमचा येणार आयपीओ

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारती एअरटेल या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीची सहकारी कंपनी भारती हेक्साकॉम लिमीटेड याचा आयपीओ 3 एप्रिलला खुला होणार असून 5 एप्रिलपर्यंत यामध्ये बोली लावता येणार आहे. सदरचा कंपनीचा समभाग 12 एप्रिल रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज यावर सुचीबद्ध होणार आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून 4275 कोटी रुपये उभारले जाणार आहेत.

आयपीओ अंतर्गत प्रति समभागाची किंमत 542-570 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 14820 रुपये गुंतवावे लागणार आहेत.

Advertisement

कंपनीची ओळख

Advertisement

सदरची कंपनी 1995 मध्ये स्थापन झाली असून दूरसंचार आणि ब्रॅडबँक सेवा देण्यामध्ये अग्रेसर राहिली आहे. राजस्थान, अरुणाचलप्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरासह इतर राज्यामध्ये सेवा देऊ करते. कंपनीकडे 31 डिसेंबर 2023 अखेर ग्राहकांची संख्या 27.1 दशलक्ष इतकी होती.

अपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड

सदरच्या कंपनीचा आयपीओ लवकरच दाखल होणार असून याकरिता मंजुरी मिळविण्याकरिता कंपनीने बाजारातील नियामक सेबी यांच्याकडे रितसर अर्ज दाखल केला आहे. कंपनी सदरच्या आयपीओच्या माध्यमातून 7 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. आयपीओअंतर्गत 1250 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग सादर केले जाणार आहेत. तर 5750 कोटी रुपयांचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केले जाणार आहेत.

Advertisement
Tags :
×

.