For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारती एअरटेल टाटा प्लेच्या अधिग्रहणासाठी इच्छुक

06:52 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारती एअरटेल टाटा प्लेच्या अधिग्रहणासाठी इच्छुक
Advertisement

कोलकाता : दूरसंचार क्षेत्रातील दुसऱ्या नंबरची मोठी कंपनी भारती एअरटेल टाटा प्ले या कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसे संकेत तज्ञांकरवी व्यक्त केले जात आहेत. टाटा समुह हा देशातील सर्वात मोठा उद्योग समुह मानला जातो. टाटा उद्योगांचे वैशिष्ठ्या म्हणजे या समुहातील कंपन्या आजवर नफा कमवत आल्या आहेत. टाटा समुहाची टाटा प्ले ही कंपनी सध्या नुकसानीत दिसून आली आहे. हे पाहून आता भारती एअरटेल याकरीता मदतीला आली आहे. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल सदरच्या कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते.

Advertisement

मित्तल यांची चर्चा

भारती एअरटेलचे प्रमुख प्रसिद्ध उद्योजक सुनिल मित्तल हे टाटा प्ले खरेदी करण्यासाठी संबंधितांशी चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. ही खरेदी पूर्ण झाली तर एअरटेलला डिजीटल टीव्हीच्या क्षेत्रामध्ये आपली मजबूत पकड बनविणे शक्य होणार आहे.

Advertisement

सर्वात मोठी डीटीएच कंपनी

टाटा प्ले ही देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी आहे. परंतु सध्याला परिस्थिती बदलली असून टायर 1 आणि टायर 2 शहरांमध्ये ग्राहक डीटीएच सेवा घेण्याऐवजी होम ब्रॉडबॅन्ड आणि ओटीटी सेवा घेण्यासाठी आग्रही दिसत आहेत. परिणामी डीटीएचची मागणी कमी होताना दिसते आहे. यामुळेच टाटाच्या टाटा प्ले कंपनीला सातत्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

दुसरा करार?

हा जर खरेदीचा करार उभय कंपन्यांमध्ये झाला तर हा दुसरा करार असेल, अशीही माहिती मिळते आहे. यापूर्वी 2017 मध्ये एअरटेलने टाटा समुहातील कंझ्युमर मोबिलीटीचा व्यवसाय खरेदी केला होता. टाटा प्ले ब्रॉडबॅन्डचे 4 लाख 80 हजार ग्राहक आहेत. एअरटेलचा डीटीएच व्यवसाय द. भारत, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहे.

Advertisement
Tags :

.