Miraj News : बेडग रस्त्यावर भरधाव चारचाकीचा अपघात; दोघे जखमी
मिरजमध्ये राष्ट्रीय महामार्ग बायपासवर चारचाकी पलटी
मिरज : शहरातील बेडग रस्त्यावर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासजवळ भरधाव चारचाकीचा अपघात होऊन पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले. शनिवारी रात्री हा अपघात झाला.
याबाबत विकास राजाराम जाधव (वय ३५, रा. कवठेपिरान) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित चारचाकी चालक उदय पाटील (रा. कारंदवाडी, ता. वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल झाला.
विकास जाधव व त्यंचे मित्र सत्यजित हाक्के असे दोघेजण संशयित उदय पाटील याच्या चारचाकीतून गावी जात होते. सदर चारचाकी बेडग रस्त्यावरुन रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाकडे गेली.
सदर महामार्गालत बायपास रस्त्यावर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव चारचाकी चालवून अपघात घडविला. या अपघातात चारचाकी मागे बसलेले विकास जाधव व सत्यजित हाक्के असे दोघेजण जखमी झाले. याबाबत जाधव यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.