For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भरतेश शिक्षण संस्थेचा 10 स्टार्टअप्सशी सामंजस्य करार

10:21 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भरतेश शिक्षण संस्थेचा 10 स्टार्टअप्सशी सामंजस्य करार
Advertisement

विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर प्रशिक्षण घेण्याची सोय

Advertisement

बेळगाव : भरतेश शिक्षण संस्थेच्या भरतेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व बेळगाव स्टार्टअप्स असोसिएशनच्या विविध दहा कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन स्टार्टअप्ससंदर्भात माहिती मिळण्याबरोबरच प्रशिक्षण घेण्यास मदत होणार आहे. यामुळे शिक्षण संस्थेच्या या उपक्रमांतर्गत स्टार्टअप्स करणाऱ्या नवीन उद्योजकांनाही चालना मिळणार आहे, अशी माहिती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे, सचिव विनोद दोड्डण्णावर, प्रा. वीणा कारची यांनी पत्रकार परिषदेत दिली. भरतेश शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धेला आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे, यासाठी नवनवीन कोर्स अवलंबिण्यात आले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग, इन्फॉर्मेशन सायन्स, या नवीन कोर्सची शिक्षण संस्थेच्या चार शाखांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. व्हीटीयूशी संलग्न असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून ही सोय करण्यात आली असून यासाठी बसवन कुडची येथे अत्याधुनिक सोयींनी युक्त महाविद्यालय उभारण्यात आले आहे.

अभियांत्रिकी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेट्रो सिटीमध्ये जाऊन नोकरीसाठी शोधाशोध करावी लागत आहे. यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या कसरती लक्षात घेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच स्टार्टअप्ससंदर्भात ज्ञान मिळावे, नवनवीन उपक्रम शिकता यावेत, मार्पेटिंग, तंत्रज्ञान याबाबत महाविद्यालयाच्या आवारामध्येच सोय व्हावी, यासाठी 10 विविध स्टार्टअप्स व्यावसायिकांबरोबर भरतेश शिक्षण संस्थेने सामंजस्य करार केला आहे. या स्टार्टअप्स व्यावसायिकांना महाविद्यालयाच्या आवारामध्येच आवश्यक प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या विकासाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यास ही मोठी सोय आहे. अशी सोय करून देणारे हे पहिलेच महाविद्यालय असल्याचे मान्यवरांकडून सांगण्यात आले. यावेळी भूषण मिरजी, प्रकाश उपाध्ये, अशोक धनवडे, शशांक लेंगडे, डॉ. अनिल शिरहट्टी, डॉ. गोमटेश रावण्णावर आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.