For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत, राहुल के. आर. शेट्टी, टेनटेन, ग्रो स्पोर्ट्स एफसी संघ विजयी

10:03 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत  राहुल के  आर  शेट्टी  टेनटेन  ग्रो स्पोर्ट्स एफसी संघ विजयी
Advertisement

बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित फॅब चषक निमंत्रितांच्या आंतर क्लब फुटबॉल स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातून भारत एफसीने डिसाईडरचा, राहुल के. आर. शेट्टीने के. आर. शेट्टी किंग्जचा, टेनटेन एफसीने ओल्ड फॅट्सचा, ग्रो स्पोर्ट्सने साईराज वॉरियर्सचा तर राहुल के. आर. शेट्टीने डिसाईडरचा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. वडगाव येथील सी. आर.सेव्हन टर्फ फुटबॉल मैदानावरती खेळविण्यात आलेल्या या फुटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात भारत एफसीने डिसाईडर संघाचा पराभव केला. भारत एफसीतर्फे सौरभ धामणेकरने दोन गोल तर अभिषेक चेरेकरने एक गोल केला. डिसाईडरतर्फे श्रेयसने एकमेव गोल केला. राहुल के. आर. शेट्टी संघाने के. आर. शेट्टी किंग्ज संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात शादाब मकानदारने दोन गोल तर रोहित घाटकरने गोल केला.

Advertisement

तिसऱ्या सामन्यात टेनटेन एफसीने ओल्डपॅडचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात आकाश देसाई, अनिकेत माने व अखिल पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केले. चौथ्या सामन्यात ग्रो स्पोर्ट्सने साईराज वॉरियर संघाचा 3-2 असा निसटता पराभव केला. ग्रो स्पोर्ट्सतर्फे अबुजर विस्तीने तीन गोल करत हॅट्ट्रिक नोंदविली तर सर्वे अनास चांदवाले व निखिल नेसरीकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. चौथ्या सामन्यात राहुल के. आर. शेट्टी संघाने डिसाईडर एफसीचा 4-3 अशा गोल फरकाने पराभव केला. राहुल के. आर. शेट्टीतर्फे नदीम मकानदार, इदायत मकानदार, रोहित घाटेकर व मिथिल मंडोळकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. तर डिसाईडरतर्फे मयूर पालेकर, मुस्तफीर जे. व अक्षय पोटे यांनी प्रत्येकी एक गोल केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.