भरत गावडे आणि विठ्ठल कदम यांना आनंदयात्री साहित्य गौरव पुरस्कार
वेंगुर्ले येथील आनंदयात्री वाङ्चय मंडळाचा पुरस्कार
ओटवणे प्रतिनिधी
वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्चय मंडळ यांचा यावर्षीचा आनंदयात्री साहित्य गौरव पुरस्कार साटम महाराज वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे आणि कुणकेरी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कदम यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक चौथे मराठी साहित्य संमेलनात साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
वेंगुर्ला एस. टी. स्टॅन्ड नजिक साई मंगल कार्यालय जयवंत दळवी नगरी येथे हे साहित्य संमेलन ७ व ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रात वावरणाऱ्या किंवा साहित्य विषयक चळवळीशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा विशेष सन्मान मान्यवरांच्याहस्ते 'आनंदयात्री साहित्य गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. भरत गावडे आणि विठ्ठल कदम गेली कित्येक वर्षे मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी साहित्य चळवळीमध्ये अग्रेसर आहेत. याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे. त्यांच्या या साहित्य क्षेत्रातील योगदानाचा यथोचित सन्मान होण्याच्या उद्देशाने आनंदयात्री वाङ्चय मंडळच्यावतीने त्यांचा 'आनंदयात्री साहित्य गौरव पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे.