कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत एफसी संघाची विजयी सलामी

10:28 AM Jul 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : स्पोर्टिंग प्लॅनेट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आयोजित एसबीजी चषक निमंत्रित  वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन सामन्यात भारत एफसीने रेग एफसीचा 3-2 अशा अटीतटीच्या लढतीत पराभव करून दोन गुण मिळवले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे पुरस्कृत माजी आमदार श्याम घाटगे, एसबीजी चेअरमन अमित घाटगे, दर्शन फुटबॉल क्लबचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, डॉ. अऊण किल्लेकरसह इतर मान्यवर उपस्थित होते. श्याम घाटगे यांच्या हस्ते फुटबॉलला किक करून व उद्घाटन सामन्यातील दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. सदर स्पर्धेत 14 संघाने भाग घेतला असून या स्पर्धेमध्ये अ गटात वायएमसीए, ब्रदर्स एफसी, भारत एफसी, पॅम्प युनायटेड, रेग एफसी, कॉसमॅक्स एफ सी, जॉन एफ सी तर ब गटात बुफा, विद्यानगर एफसी, डीयुएफसी, एफएफसी, आयबीसीटी, साईराज युएफसी, खानापूर युनायटेड आदी संघांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement

भारत एफसीने रेग एफसीचा अतितटीच्या लढतीत 3-2 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 22 व्या मिनिटाला भारत एफसी च्या सुजलच्या पासवर किरणने गोल करून 1-0 अशी महत्वाची आघाडी मिळवली. 31 व्या मिनिटाला रेग एफ सीच्या शाहिदच्या पासवर अन्सारने गोल करून 1-1 अशी बरोबरी करून सामन्यात रंगत निर्माण केली. दुसऱ्या सत्रात 62 व्या मिनिटाला किरणच्या पास वर सुजलने दुसरा गोल केला तर 72 व्या मिनिटाला सुजलच्या पासवर सौरभने तिसरा गोल करून 3-1 महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. 83 व्या मिनिटाला रेग एफसीच्या अन्सारच्या पासवर शाहिदने गोल करून 2-3 अशी आघाडी कमी केली. त्यानंतर रेग एफसी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले,पण त्यांना अपयश आले. या सामन्यासाठी पंच म्हणून इम्रान बेपारी, अभिषेक चेरेकर, पवन देसाई, अमीन पिरजादे, तर सामनाधिकारी म्हणून रॉयस्टीन जेम्स यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article