भारत अ संघाच्या कर्णधारपदी भरत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारताच्या अ संघ चालू महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यात चार दिवसांचे दोन सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी आंध्रप्रदेशचा यष्टीरक्षक आणि फलंदाज के. एस. भरतकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
बीसीसीआयतर्फे गुरुवारी या दोन सामन्यांसाठी स्वतंत्र संघांची घोषणा करण्यात आली. भारत अ संघामध्ये या दोन्ही सामन्यांसाठी कर्णधार के एस भरत, साईसुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव ज्युरेल, मानव सुतार, विधीवत कविरप्पा यांचा समावेश आहे. मात्र तंदुरुस्तीनंतरच ईश्वरनचा समावेश संघात केला जाईल. ईश्वरनने आपला शेवटचा सामना गेल्या जूनमध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात अंतिम सामना झाला होता. कर्नाटकाच्या देवदत्त पडिकलने सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये फलंदाजीत सातत्य राखल्याने त्याला 25 डिसेंबर रोजी (बॉक्सींग डे) सेंच्युरियन येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी संघात निवड केली आहे. पहिल्या सामन्यासाठी मुंबईचा सर्फराज खान, प्रसिद्ध कृष्णा, तुषार देशपांडे यांचा समावेश आहे. हा पहिला सामना 11 ते 14 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल तर दुसरा 4 दिवसांचा सामना 26 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या दुसऱ्या सामन्यासाठी तिलक वर्मा, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल आणि नवदीप सैनी यांचा भारत अ संघात समावेश राहिल.
या दौऱ्यामध्ये 20 ते 22 डिसेंबर दरम्यान तीन दिवसांचा एक सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र द. आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत शर्मा आणि कोहली उपलब्ध राहणार नाहीत. बुमराह, शमी, रविचंद्र अश्विन, रविंद्र जडेजा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचा या संघामध्ये समावेश आहे. या तीन दिवसांच्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची घोषणा अद्याप बीसीसीने केलेली नाही.
भारत अ संघ पहिल्या सामन्यासाठी भारत अ संघ : के एस भरत (कर्णधार), साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पडिकल, प्रदोष, रंजन पॉल, सरफराज खान, ध्रुव ज्युरेल, शार्दुल ठाकुर, पुलकित नारंग, सौरभ कुमार, मानव सुतार, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, व्ही. कविरप्पा आणि तुषार देशपांडे.
भारत अ संघ दुसऱ्या सामन्यासाठी भारत अ संघ : के एस भरत (कर्णधार), साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, मानव सुतार, ध्रुव ज्युरेल, आकाशदीप, व्ही. कविरप्पा आणि नवदीप सैनी.
इंडिया इंटर संघ तीन दिवसांच्या सामन्यासाठी : रोहित शर्मा, जैस्वाल, गिल, ईश्वरन, पडिकल, कोहली, श्रेयस अय्यर, सरफराज खान, प्रदोष पॉल, के एस भरत, ध्रुव ज्युरेल, इशान किसन, रविंद्र जडेजा, अश्विन, पुलकित नारंग, हर्षित राणा, शार्दुल ठाकुर, सौरभ कुमार, मानव सुतार, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, व्ही. कविरप्पा, बुमराह, मोहम्मद सिराज, शमी आणि नवदीप सैनी.