For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत अरुण एलएसजीच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी सामील

06:26 AM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत अरुण एलएसजीच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी सामील
Advertisement

वृत्तसंस्था / लखनौ

Advertisement

कोलकातानाईट रायडर्सशी अलिकडेच संबंध तोडणारे भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना लखनौ सुपर जायंट्सने त्याच पदावर नियुक्त केले आहे. जरी अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहत असली तरी अरुण एलएसजीमध्ये सामील झाला आहे आणि लवकरच औपचारिक घोष्घ्णा अपेक्षित आहे, असे फ्रँचायझीच्या जवळच्या सुत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

अरुण गेल्या काही वर्षांपासून केकेआरशी संबंधित होते. परंतु 2025 मध्ये आठव्या स्थानावर खराब कामगिरी केल्यानंतर शाहरुख खानया मालकीच्या फ्रँचायझी अभिषेक नायर आणि ड्वेन ब्राव्होसह त्यांया प्रशिक्षक स्टाफमध्ये फेरबदल करण्याया प्रक्रियेत आहे. त्यामुळे चंद्रकांत पंडीत आणि अरुण हे दोन्ही अनुभवी खेळाडू वेगळे झाले. त्याच प्रमाणे गेल्या आवृत्तीत सातव्या स्थानावर राहिलेल्यानंतर एलएसजी देखील त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करत आहे. गेल्या हंगामात एलएसजीची गोलंदाजी अव्वल दर्जाची नव्हती.  आणि त्यो बरेसचे कारण भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज मयंक यादव दोन सामन्यांशिवाय सर्व  सामन्यांमध्ये अनुपस्थित होता.

Advertisement

राष्ट्रीय संघाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोलंदाजी प्रशिक्षकांपैकी एक असलेले अरुण त्यांच्या धोरणात्मक कौशल्यासाठी तसेच प्रतिभावान वेगवान गोलंदाजांना तयार करण्यासाठी आदरणीय आहेत. एलएसजी त्यांचा मार्गदर्शक झहीर खानसोबतचा करार नूतनीकरण करणार का, याबद्दलही तपशीलांची प्रतीक्षा आहे. माजी भारतीय महान खेळाडूचा करार एक वर्षाचा होता आणि तो नूतनीकरण होतो का, हे पाहणे मनोरंजक असेल. मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगरसाठीही असेच आहे. जे गेल्या काही हंगामापासून कार्यरत आहेत.

Advertisement
Tags :

.