भंडारी समाजाने मतभेद विसरून एक व्हावे! केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांचे आवाहन
रत्नागिरीत भंडारी समाजाच्या महाअधिवेशनाला उपस्थिती; गौरवशाली इतिहासाची करून दिली आठवण
रत्नागिरी प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भंडारी समाजाचा एक गौरवशाली इतिहास आह़े महाराजांच्या आरमारामध्ये भंडारी समाज प्राण प्रणाला लावून ब्रिटीश मुघल यांच्याशी लढल़ा तसेच दानशुर भागोजीशेठ कीर, एस. के. बोले, चरित्रकार धनंजय कीर, भाई सारंग यांसारखी नररत्ने या समाजात जन्माला आल़ी दुर्दैवाने आपल्याला पूर्वजांच्या इतिहासाचे विस्मरण झाले आह़े भंडारी समाज विखुरला असून गतवैभव प्राप्त करण्यासाठी आपल्यातील मतभेद विसरून एक झाले पाहिजे, असे आवाहन केंद्रिय नवीकरण रूर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केल़े.
शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यागृह येथे रविवारी आयोजित भंडारी समाजाच्या महाअधिवेशन मेळाव्याला मंत्री श्रीपाद नाईक यांनी उपस्थिती लावल़ी मेळाव्याला अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष रमेश कीर, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, ज्येष्ठ पत्रकार राजेश कोचरे आदी उपस्थित होत़े यावेळी बोलताना नाईक म्हणाले की, भंडारी समाजाच्या एकत्रिकरणासाठी आयोजित हा मेळावा स्तुत्य उपक्रम आह़े भंडारी समाजाच्या अलौकिक पराक्रमाने रूर भरून येतो. भंडारी मुळचे लढवय्ये, त्यांना हाताशी धरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केल़ी भंडाऱ्यांनी प्राण पणाला लावून महाराजांची साथ केल़ी त्यापैकी महत्वाचे नाव म्हणजे मायनाक भंडाऱी त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरमाराने अनेक पराक्रम केल़े आमच्या समाजबांधवाची थोरवी वर्णावी तेवढी थोडी आह़े ब्रिटिशांनाही सडेतोड उत्तर देण्याची हिम्मत भंडारी समाजात होत़ी.
भंडारी समाज विखुरलेल्या स्वरूपात आह़े आपली ताकद, पूर्वइतिहास हा समाज विसरत चालला आह़े भंडारी समाज पुन्हा एकसंघ कसा होईल, आपले गतवैभव आपल्याला कसे प्राप्त करता येईल, याचा विचार व्हायला हव़ा भंडारी समाज एवढा मोठा आहे की, इतर समाजालाही आधार देण्याची क्षमता या समाजामध्ये आह़े त्यामुळे आपल्यामधील मतभेद विसरून ज्योत ज्योतीने मशाल पेटवावी लागेल़ अहंकार बाजूला ठेवून आपण पुढे गेले पाहिज़े एकादे पद मलाच मिळायला हवे, हा अट्टहास आपण सोडायला हवा, असे मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
..तर समाजाचा विकास कोणीही रोखू शकणार नाही
भंडारी समाजाने आपली शक्ती जागृत करायला हव़ी आपल्याला जेव्हा आपल्या ताकदीची जाणीव होईल, तेव्हा सर्वांना हा समाज पुरून उरेल़ आपल्या एकट्याने काय होणार, असा विचार करू नय़े रामाने सेतू बांधत असताना खारीनेही सहभाग घेतला होत़ा समाजाचे काम करत असताना आपल्याने शक्य होईल तेवढा खारीचा वाटा आपण उचलायला हव़ा आज सर्वत्र विकास होत आह़े त्यामुळे भविष्यात कुणालाही आपले घर सोडून जावे लागणार आह़े समाजाला एकप्रकारे मरगळ आली आहे, ती दूर झाली तर या समाजाचा विकास कोणीही रोखू शकणार नाही, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितल़े.
मेळाव्यात बोलताना कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष रमेश कीर म्हणाले की, भंडारी समाज हा लढवय्या आह़े वादळाशी कस लढावं, हे या समाजाला शिकवावं लागत नाह़ी बदलत्या काळासोबत भंडारी समाजानेही आपल्यात बदल करायला हव़ा दुसऱ्याच वाईट करण्यापेक्षा आपलं चांगल कसं हाईल, याचा विचार कराव़ा शिक्षण व मfिहलांचा सन्मान करायला आपण शिकलं पाहिज़े जो समाज घरातल्या स्त्रीचा सन्मान करत नाही, तो कधीच प्रगती करू शकत नाह़ी स्पर्धा-परीक्षांमध्ये देखील आपली मुलं मागे पडत आहेत, याचाही आपण विचार करायला हव़ा समाज म्हणून आपण या मुलांच्या मागे उभं रहायला हव़ तरच आपण समाजामुळे मोठे झालो, अशी भावना आपल्या मुलांमध्ये निर्माण होईल़ राजकारणामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले आह़े त्यामुळे राजकारणापासून आपण सर्वांनी लांब रहायला हवे, असे रमेश कीर यांनी बोलताना सांगितल़े.
मेळाव्यात पत्रकार राजेश कोचरेकर यांनीही मनोगत व्यक्त केल़े तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना भंडारी समाज संघाचे तालुकाध्यक्ष राजीव कीर यांनी केल़ी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मुंड्यो यांनी केल़े या कार्यक्रमाला आशिष पेडणेकर, उद्योजक सुनील भोंगले आदी उपस्थित होते.