कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur News : पेठ वडगाव येथे श्री हलिसिद्धनाथ महाराज व संत बाळूमामांचा भंडारा सोहळा उत्साहात

12:38 PM Dec 14, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                               भंडारा सोहळ्यात डोणे महाराज यांची भाकणूक

Advertisement

पेठवडगाव : भाकणूककार श्री कृष्णात डोणे महाराज यांचे शिष्य श्री मयूर सनगर महाराज यांच्या वतीने पेठवडगाव शहरात भंडारा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याची सुरुवात सणगर गल्ली येथून पारंपारिक ढोलाच्या गजरात भंडाऱ्याची मुक्त उधळण करत पेठवडगाव शहरातील नगरपालिका चौक, बिरदेव चौक, हनुमान रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पद्मा रोड मार्गे नगरप्रदक्षिणा करत नगरपालिका चौकातून मयूर सनगर महाराज यांच्या घरी सांगता झाली... 

Advertisement

यावेळी बैलगाडी त मामांची प्रतिमा तर रथामध्ये श्री हलसिद्धनाथांची व मामांच्या मूर्तीची तर मिरवणूकीत धनगरी ढोलांचा वाद्यात , हलगीच्या ठेक्यात व अश्वा बरोबर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती यावेळी हेडाम खेळून सायं डोणे महाराज यांची भाकणूक झाली,

भाकणूकीत ऋतुमानाचं कालमान बदलत राहील, उन्हाळ्याचा पावसाळा व पावसाळ्याचा उन्हाळा होईल, बारा महिने पाऊस पडेल,रेल्वे व विमान यांचा मोठा अपघात होईल, डोळ्याने बघशीला कानाने ऐकशीला, निपाणी भागात अतिरेकी येतील मोठा घोटाळा करतील,सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडतील, जग दुनियात मोठं एक नवाला घडेल मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल, कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडलंय रात्री बाराच्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी गा पडतया , भगवा झेंडा राज्य करेल , करीन करीन पांढरीची राखणी करीन, जो सेवा करेल त्याची मी राखण करेन,
संपूर्ण बालभक्तास वृद्धास माझा आशीर्वाद राहील ,

या प्रकारची भाकणूक यावेळी झाली यानंतर महाआरती करण्यात आली व महाप्रसादास सुरुवात झाली या महाप्रसादाचा, पेठ वडगाव व पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला, यावेळी सेवेकरी संताजी पाटील बापू, ओमकार पाटील, किरण पाटील यांसह सर्व मानकरी, सेवेकरी व भक्तगण उपस्थित होते

Advertisement
Tags :
#BhandaraFestival#MaharashtraCulture#pethvadgaon#SpiritualEventKolhapurDistrictReligiousProcession
Next Article