महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्विस टेनिस स्पर्धेत भांब्री विजेता

06:37 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ गॅस्टेड (स्विस)

Advertisement

एटीपी टूरवरील येथे झालेल्या स्विस खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू युकी भांब्रीने फ्रान्सचा साथिदार ओलिव्हेट समवेत दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. भांब्रीच्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील हे तिसरे जेतेपद आहे.

Advertisement

एटीपी टूरवरील 250 दर्जाच्या क्लेकोर्टवरील या स्पर्धेत रविवारी झालेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भांब्री आणि ओलिव्हेट यांनी फ्रान्सच्या हंबर्ट व मार्टिन यांचा 3-6, 6-3, 10-6 असा पराभव केला. हा अंतिम सामना 70 मिनिटे चालला होता. 32 वर्षीय भांब्रीने 2023 साली मॅलोर्का टेनिस स्पर्धेत लॉइड हॅरिस समवेत एटीपी टूरवरील पहिले जेतेपद मिळविले होते. त्यानंतर गेल्या एप्रिल महिन्यात त्याने बीएमडब्ल्यू खुल्या टेनिस स्पर्धेत ओलिव्हेट समवेत दुसरे जेतेपद पटकाविले. 24 जून रोजी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या दुहेरीच्या मानांकन यादीत भांब्रीने पहिल्या 50 टेनिसपटूंमध्ये स्थान मिळविले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article