महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भाजपचे पुन्हा धक्कातंत्र ! भजनलाल शर्मा होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

05:46 PM Dec 12, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

छत्तीसगड व मध्यप्रदेशनंतर भाजपने राजस्थाच्या मुख्यमंत्री पदी नवा चेहरा दिला आहे. भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.

Advertisement

भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत जयपूरमध्ये आज विधिमंडळ पक्षाची बैठक झाली.या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व सरचिटणीस विनोद तावडे, सरोज पांडे या बैठकीला उपस्थित होते.

Advertisement

भजनलाल शर्मा हे सांगानेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. शर्मा हे ब्राह्मण समाजातील आहेत. ब्राह्मण समाजातील व्यक्तीला राज्याच्या प्रमुख पदी बसवण्याचा निर्णय आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जात आहे.

Advertisement
Tags :
bajapbhajanlal sharmaCMnewRajsthan
Next Article