For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भजनलाल राजस्थानचे नवे मुख्यमंत्री;शपथविधी संपन्न

03:22 PM Dec 15, 2023 IST | Kalyani Amanagi
भजनलाल राजस्थानचे नवे मुख्यमंत्री शपथविधी संपन्न
Advertisement

भाजप नेते भजनलाल शर्मा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. यादरम्यान शर्मा यांच्यासोबत दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा या दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी तिघांनाही शपथ दिली. हा कार्यक्रम जयपूरमधील अल्बर्ट हॉलसमोर आयोजित करण्यात आला होता.शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल कलराज मिश्रा यांनी तिघांनाही शपथ दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.