भैरु, फाल्गुन, राकेश, कीर्ती,भक्ती, प्रशांत विजेते
युवावर्गाने व्यसनाधीन न होता व्यायाम करत आरोग्य जपावे - ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी
बेळगाव : मराठा सेंटरतर्फे शौर्यवीर रन 2025 या प्रेरणादायी धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन शिवाजी मैदान, कॅम्प येथे करण्यात आले होते. भारतीय सेनेच्या 79 व्या इन्फंट्री डे निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला होता. शौर्यवीर रन म्हणजे “स्पिरिट ऑफ द इन्फंट्री“ धैर्य, सहनशक्ती आणि एकतेचा उत्सव यांचे प्रतीक आहे. याचबरोबर बेळगावतील युवा खेळाडूना प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय अभिमान, आरोग्य जागरूकता आणि भारतीय पायदळ दलाबद्दल कृतज्ञतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविणे हे आमचे ध्येह आहे, असे प्रतिपादन मराठा रेजिमेंटचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी केले. या स्पर्धा दरम्यान मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे ‘शौर्यवीर रन 2025’ या प्रेरणादायी धावण्याच्या स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धाकांनी भाग घेतला होता. पाच ते पंन्नास वर्षा पर्यंत पुरूष व महिलांचा सहभाग होता तर विविध गटातील विजेत्याना प्रमाणपत्र पदक देऊन गौरविण्यात आले.
शौर्यवीर रन निकाल पुढील प्रमाणे
5 कि. मी. 17 वर्षा खालील मुलांचा गट : फाल्गुन पाटील सुवर्ण,आर्यन आर.एम.रौप्य,हर्षवर्धन कांस्य मुलींचा गट-भक्ती पाटील सुवर्ण, साईश्री पाटील रौप्य, भूमिका पुंडे कांस्य. 10 कि. मी. 30 वर्षांखालील मुलांचा गट : भैरु नायक सुवर्ण, आंनद रौप्य, निखील आर कांस्य मुलीचा गट- साई सुवर्ण. 10 कि. मी. 40 वर्षांखालील पुरुष-राकेश निकम सुवर्ण,अंकुश पी रौप्य, शंकर मगदूम कांस्य, महिला गट-कीर्ती मालापूर सुवर्ण, अंनघा रौप्य, प्रियांका स्वामी कांस्य, 10 कि. मी. 50 वर्षांखालील पुरुष-परशुराम कांगी सुवर्ण,राजू पाटील रौप्य, धर्मराज शाहापूरकर कांस्य, महिला गट-अरुणधती पोटे सुवर्ण, कीर्ती टोपन्नावर रौप्य, शिवानी अनगोळकर कांस्य, 21 कि. मी. 30 वर्षांखालील मुलांचा गट- श्रीकांत बी सुवर्ण, निलेश सांवत रौप्य, आरविंद करांडे रौप्य, मुलीचा गट-स्नेहा बन्सल सुवर्ण, अंकाक्षा रौप्य, 21 कि. मी. 40 वर्षांखालील पुरुष-गुरव प्रदिप शंकर सुवर्ण, दिनेश ठोंबरे रौप्य, सुरेश चौगुले कांस्य, 21 कि. मी. 50 वर्षांखालील पुरुष-प्रशांत शिरसाट सुवर्ण, राघवेद्र पाटील रौप्य, निहार हेरवाडकर कांस्य, महिला गट -नेत्रा सुतार सुवर्ण, निलम पुरोहिते रौप्य, निधी चौगुले कांस्य, 21 कि. मी. 50 वर्षांवरील पुरुष- शिवलिंग गूट्ठागी सुवर्ण, कलप्पा तीरवीर रौप्य, राधाकृष्णा नादो कांस्य, महिला गट - रुपा कापाडी सुवर्ण, रुपा निरजंन रौप्य, 10 कि. मी. 50 वर्षांवरील पुरुष-रंजित शिवाजी सुवर्ण, यंशवत परब रौप्य, चंद्रकात पाडोलकर कांस्य, महिला गट-ज्योती खानेकर सुवर्ण, सुरेखा मालापूर रौप्य, या स्पर्धाकांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.