कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भैरोबाचा माळ बनतोय ऑक्सिजन पार्क

06:06 PM Jul 29, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर  / संग्राम काटकर :

Advertisement

करवीर तालुक्यातील भुये-भुयेवाडीतील हे आहेत 40 तऊण. त्यांचे एकच लक्ष्य भुये-भुयेवाडीतील भैरोबाच्या माळाला हिरवाईने नटवणे. आपल्या लक्ष्याला सत्यात उतरवण्यासाठी ते कृतिशील झाले. याच कृतीतून भैरोबाच्या माळावर 3500 वर झाडे लावली गेली. यातील तब्बल 1 हजार 45 झाडे जगली. या झाडांनी भैरोबाचा माळ हिरवागार बनला. शिवाय माळाचे ऑक्सिजन पार्कमध्ये ऊपांतर झाले आहे.
भुये-भुयेवाडीतील भैरोबाच्या माळ खडकाळ आणि ओसाड. माळावर झाडांची संख्या तशी कमीच होती. भुयेचे रहिवाशी आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे स्वीय सहायक अमर पाटील यांनी 2010 साली या खडकाळ भैरोबाच्या माळाला हिरवाईने फुलवण्याचे ठरले. आपल्या उपक्रमाला सत्यात आणण्यासाठी पाटील यांनी तऊणांची मोट बांधली. त्यांना कृतिशील करत प्रत्येक रविवारी भैरोबाच्या माळावर वृक्षारोपण करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले.

Advertisement

भुये-भुयेवाडीचे ग्रामदैवत असलेल्या भैरोबाचा वार रविवार. प्रत्येक रविवारी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम 2010 पासून सुऊ केला. झाडे लावण्यासाठी खड्डे काढताना माळावरचा भाग खडकाळ लागला. अशा परिस्थितीत अमर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाहेरची माती माळावर नेली. खडकात खड्डे पाडून त्यात माती टाकली आणि या मातीत झाडे लावली. सुऊवातीला काही कारणास्तव मेलेल्या झाडांच्या जागी दुसरी झाडे लावली आणि जगवली.

पुढील काळात अमर पाटील आणि सहकारी मित्रांनी ठिकठिकाणच्या इमारती, कंपाऊंड व उघड्या जागेमध्ये उगवलेल्या आंबा, वडासह विविध प्रकारची लहान-मोठी झाडे काढून घेऊन त्यांची भैरोबाच्या माळावर रोपण केली. 2013 पासून तर केवळ देशी झाडे लावण्याचे सर्वांनी पक्के केले. जुन ते ऑक्टोबर असा पावसाळी वातावरणाचा कालावधी झाडे लावण्यासाठी निश्चित केला. सामाजिक वनीकरण विभागाला भेटून आपल्या वृक्षारोपण उपक्रमाची माहिती त्यांना दिली. या विभागांनी उपक्रमाबाबत सकारात्मकता दाखवत झाडे देण्यास समर्थता दर्शवली. विभागांकडून मिळणारी देशी झाडे माळावर लावण्यात येऊ लागली.

2020 मध्ये सर्वांना एकाच छताखाली आणण्यासाठी अमर पाटील यांनी भैरोबा वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन समितीची स्थापना केली. समितीत तऊणांना घेतले. समितीतील सर्वांनीच एक वेगळी शक्कल लढवत मित्रमंडळींच्या घरी वाढलेली झाडे एकत्र करायला सुऊवात केली. मित्रमंडळींकडून मिळणाऱ्या झाडांना खत घाऊन माळावर लावले जाऊ लागले. समितीच्या माध्यमातून हळूहळू हिरवाईने नटत असलेल्या भैरोबाच्या माळावर पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे नोव्हेंबरनंतर झाडांना पाणी घालण्यासाठी समितीला खूप कसरत करावी लागे.

सुदैवाने भुयेवाडी केदारलिंग सहकारी पाणी पुरवठा संस्थेची जलवाहिनी भैरोबा माळ परिसरात होती. या जलवाहिनीतील पाणी मिळवण्यासाठी समिती सदस्य केदारलिंग संस्थेचे सचिव विकास पाटील यांना भेटली. त्यांनाही पाणी देण्यास समर्थता दर्शवली. संस्थेच्या पाईपलाईनद्वारे मिळत राहणारे पाणी दुसऱ्या पाईपने झाडांना घालण्याचे काम अमर पाटील यांनी भुये येथील पोपट शियेकर यांच्यावर सोपवले. तेव्हापासून गरजेनुसार शियेकर हे झाडांना पाणी घालण्याचे काम करत आहेत. एकंदरीत या सगळ्dया कसरतीमुळेच माळावर 1 हजार 45 झाडे जगली आहेत. सातशेवर झाडांची उंची तर 10 ते 15 फुटांपर्यंत गेली आहे. एकेकाळी ओसाड दिसणारा भैरोबाचा माळ आता हिरवाईने नटला आहे. 15 वर्षापासूनच्या परीश्रमामुळेच हे घडले आहे.

वृक्षारोपण करणाऱ्या भैरोबा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समितीतील सदस्य :
समन्वयक अमर पाटील, दीपक पाटील, पैलवान सुभाष साळुंखे, प्रणव पाटील, सचिन पाटील, अमर मिसाळ, अनिल मिसाळ, आदित्य पाटील, पार्थ पाटील, केदार पाटील, उद्धव पाटील, निलेश पाटील, अमर शिंदे, रामचंद्र पाटील, कृष्णात चौगुले, बाजीराव पाटील, यशराज पाटील, आदित्य पाटील, प्रतीक पाटील, शिवाजी कांबळे, प्रणव तळेकर, सागर पाटील, तुकाराम शियेकर, सागर पाटील, सागर सुतार, प्रकाश फडतारे, गणेश फडतारे, शामराव खाडे, आदित्य पाटील, विकास तळेकर, विष्णू पाटील, संजय पाटील, सर्जेराव पाटील, विश्वास पाटील, देव पाटील, लहू पाटील, प्रल्हाद पाटील, कृष्णा पाटील, साईराज शिंदे, शब्दा पाटील, सई पाटील, तन्मय पाटील, वेदिका पाटील, श्रीतेज पाटील, समृद्धी सुतार, सायली पाटील, महेश्वरी नरंदे, आराध्या वाघमोडे.

भैरोबाच्या माळावर लावलेली झाडे अशी :
वड, पिंपळ, लिंब, करंज, उंबर, आवळा, शिकेकाई, रुद्राक्ष, बेहडा, पिपर्णी, आंबा, चिंच, इलायची चिंच, बेल, कवट, अंजीर, नारळ, सीताफळ, पेरु, करवंदे, जांभूळ.

वृक्षारोपणाचा 15 वर्षांपासून सुऊ असलेला अखंड यज्ञ यशस्वी करण्यासाठी भुये व भुयेवाडीच्या ग्रामपंचायतींसह सामाजिक वनीकरण व वन विभागाकडून मोठे सहकार्य मिळत आहे. भैरोबा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समिती वृक्षारोपण करताना भैरोबाचा संपूर्ण माळही स्वच्छ व टापटीप देण्याचे काम करत आहे.
                                                                              -अमर पाटील समन्वयक, भैरोबा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समिती

 

 

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article