For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धर्म रक्षणासाठी भगवतगीता अभियान महत्त्वाचा उपक्रम

06:51 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
धर्म रक्षणासाठी भगवतगीता अभियान महत्त्वाचा उपक्रम
Advertisement

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी : भगवतगीता अभियान महासमर्पण कार्यक्रम

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

सनातन धर्माचा डेंग्यू, मलेरियाशी तुलना करुन मुळासकट उखडून टाकण्याचा प्रयत्न चालला आहे. यासाठी सनातन धर्माचे संरक्षण करण्यासाठी भगवतगीता अभियान अत्यंत महत्वाचे ठरले आहे, असे केंद्रिय कायदा आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

Advertisement

येथील लिंगराज महाविद्यालयाच्या मैदानावर महांस्थान मठ भगवतगीता अभियान आणि जनकल्याण ट्रस्ट बेळगाव यांच्या सहयोगाने शनिवारी राज्यस्तरीय भगवतगीता अभियान महासमर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. 2008 ते 2014 या काळात जगातील पाच अत्यंत दुबळ्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा समावेश होता. मात्र आज जगातील पाच मोठ्या आर्थिक देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. तंत्रज्ञान, सेवा आदींमध्ये देशाला उज्वल भविष्य मिळाले आहे. मात्र दुसरीकडे संस्काराच्या अभावी अनेक अुचित घटना घडत आहेत. एकटेपण अत्यंत मोठी समस्या बनली आहे. ही समस्या भारतात येऊ नये यासाठी संस्कार शिक्षण देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या संस्कृतीमुळेच जनतेमध्ये आज पाप, पुण्याची जाण आहे. जगात शांती, सुव्यवस्था लाभावी अशी सनातन धर्माची संकल्पना आहे. कोणालाही भगवतगीतेत सांगितल्या प्रमाणे करा, असे श्रीकृष्णांनी सांगितले नाही. तुमच्या इच्छेनुसार करा, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भगवतगीता श्रेष्ठ आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी गंगाधरेंद्र सरस्वती स्वामीजी यांनी व्यक्तीत्व विकासाचे गरज, राष्ट्रीय एकता राखली पाहिजे, भारत जागतिक गुरू व्हावी, अशी आपली सर्वांची इच्छा असून यासाठी भगवतगीतेतील तत्वांचे आचरण केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यासाठी सर्व मठांनी एकत्र आले पाहिजे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट असून धर्माच्या संरक्षणासाठी व राष्ट्राच्या हितासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पेजावर विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणिव ठेऊन भगवतगीतेतील संदेशाची माहिती करुन दिली. मानव समुहजीवी आहे. समाजाकडून सर्व काही मिळविले आहे. सर्व जण सर्व काही मिळवितात. मात्र त्याबद्दलत्यात काहीही देत नाहीत. असा समाज फार काळ टिकत नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्यसभा सदस्य सुधांशु त्रिवेदी बोलताना म्हणाले, महात्मा गांधीजी यांनीही भगवतगीतेकडूनच प्रेरणा मिळविली होती. बेळगावमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष गांधीजी होते. त्याच भगवतगीतेचे अभियान बेळगावमध्ये होत असल्याने हा एक योगायोग आहे.

यावेळी मातांकडून भगवतगीतेच्या दहाव्या अध्यायाचे महासमर्पण करण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धांमधील भगवतगीता तोंडपाठ, भाषण, प्रश्न मंजुषा, विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कलापथकाकडून भारतनाट्याम् सादर करण्यात आले. भगवतगीता अभियानाचे कार्याध्यक्ष परमेश्वर हेगडे यांनी अहवाल वाचन केले. भगवतगीता अभियान समिती अध्यक्ष गोपाळ जिनगौड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. माहेश्वरी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांकडून आरती सादर करण्यात आली. यावेळी खासदार आण्णासाहेब जोल्ले, मंगला अंगडी, ईरण्णा कडाडी, विधानसभेचे माजी अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद देशपांडे, सोंदास्वर्ण मठाचे अध्यक्ष व्ही. एन. हेगडे, संजय पाटील, अनिल बेनके आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.