कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिथरलेल्या हत्तीपासून सावध राहावे

11:21 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोंढा वनाधिकाऱ्यांचे आवाहन : कळपांचा गुंजी, तिवोली भागात वावर : हत्तींना पिटाळण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करू नये

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्याच्या वनविभागात दांडेली जंगलातून काही हत्तींचे कळप लोंढा आणि नागरगाळी जंगलात गेल्या महिन्याभरापूर्वी आले असून सध्या तीन वेगवेगळे हत्तींचे कळप हे लोंढा वनविभागातील गुंजी आणि हेम्माडगा परिसरात वावरत आहेत. यातील एका कळपातील मुख्य हत्ती भरकटल्याने त्या हत्तींचा कळप बिथरलेला आहे. हा कळप गुंजी, तिवोली भागात वावरत आहे. कळप भेदरलेला असल्याने माणसांवर हल्ला करू शकतो. मुख्य हत्तीचा शोध घेण्याचे काम वनखाते करत असून भरटकलेल्या मुख्य हत्तीला कळपात सामील करण्यासाठी वनखाते कार्यरत आहेत. शेतकऱ्यांनी हत्तीना हुसकावण्यासाठी कोणतेही प्रयत्न करू नयेत, हत्ती आढळून आल्यास वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लोंढा वन विभागाचे वनाधिकारी तेज वाय. पी. यांनी केले आहे.

Advertisement

दांडेली जंगलातून काही हत्तींचे कळप वेगवेगळ्या मार्गाने लोंढा, नागरगाळी वन विभागात दाखल झाले आहेत. दरवर्षी भाताच्या सुगीच्या वेळी हे हत्ती दांडेली जंगलातून नागरगाळी आणि लोंढा वन विभागात येतात. मात्र यावर्षी हत्तींच्या कळपांची संख्या वाढली आहे. यातील दोन कळप पुन्हा दांडेली जंगलात हुसकावण्यात यश आले आहे. बाकीचे तीन कळप लोंढा वन विभागात सक्रिय आहेत. यात गुंजी परिसरात दोन कळपांनी गेल्या आठ-दहा दिवसापासून ठाण मांडले आहे. काही शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसानही केलेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात येईल. या हत्तींच्या कळपातील मुख्य हत्तीनी कळपांना सोडून अन्यत्र भरकटली आहे. त्यामुळे पाच हत्तींचा कळप हा मुख्य हत्तीच्या शोधात धुडगूस घालत आहे.

कळप आढळल्यास तातडीने वनखात्याशी संपर्क साधावा

या कळपाला हुसकावण्यासाठी शेतकऱ्यांनी फटाके अथवा बॉम्बचा वापर केल्यास हत्तींचा कळप बिथरण्याची शक्यता आहे. बिथरलेला कळप मानवावर हल्ला करू शकतो. यासाठी हत्तींचा कळप आढळल्यास तातडीने वनखात्याशी संपर्क साधावा, तसेच जो मुख्य हत्ती भरकटलेला आहे. त्याच्या शोधासाठी वनखाते गेल्या काही दिवसांपासून कार्यरत आहे. जर मुख्य हत्ती आढळल्यास या कळपात आणून सोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वाय. पी. तेज यांनी सांगितले.

कळपांना हुसकावण्यासाठी सहकार्य करावे

हत्तींच्या कळपाचा मुख्य हत्ती हा मादी हत्ती असतो. या हत्तीनीच्या कळपात तीन पिढ्यांचा हत्तींचा सहभाग असतो. ही हत्तीनी मुख्य असते. ती ज्या मार्गाने जाते त्याच मागोमाग बाकीचे कळपातील हत्ती जात असतात. शेतकऱ्यांनी हत्तीना पिटाळण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे. त्यातील एका कळपाची मुख्य हत्तीन ही भरकटलेली असल्याने बाकीचे हत्ती बिथरलेले आहेत. त्यांना कायमचा वहीवाटीचा रस्ता दाखवण्यासाठी मुख्य हत्तीन कळपात सामील होणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना बिथरलेला एक हत्ती अथवा कळप आढळल्यास हत्तीना हुसकावण्यासाठी कोणतीही उपाययोजना करू नये. तसेच पर्यावरणवादी तसेच वन्यप्रेमी नागरिकांनी हत्तीच्या कळपांना पुन्हा नागरगाळी जंगलात घालवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाय. पी. तेज यांनी केले आहे. लोंढा वनविभागाच्यावतीने गेल्या आठ-दहा दिवसांपासून लोंढा वनविभागातील हत्ती सक्रिय असलेल्या गावामध्ये हत्तीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यात व्हीडीओद्वारे हत्तीना कशाप्रकारे हाताळावे तसेच हत्तीबाबत कोणती जागृती बाळगावी, याचीही माहिती लोंढा वन विभागाकडून देण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article