महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑनलाईन फसवणुकीपासून सावधानता बाळगा!

07:10 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मन की बातमध्ये पंतप्रधानांचे आवाहन : ‘डिजिटल अरेस्ट’दरम्यान ‘थांबा-विचार करा-कृती करा’चा मंत्र

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या 115 व्या भागात देशवासियांना ‘डिजिटल अरेस्ट’बाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला. ऑनलाईन सायबर फसवणूक टाळण्यासाठी ‘थांबा-विचार करा-कृती करा’ असा मंत्रही त्यांनी दिला आहे. तसेच पंतप्रधानांनी सरदार पटेल आणि बिरसा मुंडा यांच्या 150 वी जयंती साजरी करण्याबद्दलही भाष्य केले. ‘डिजिटल अरेस्ट’बद्दल बोलण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ दाखवत अशाप्रकारच्या घटना कशा घडतात हे सांगितले. ऑनलाईन फसवणूक करणारे लोक आपण पोलीस, सीबीआय, नार्कोटिक्स किंवा आरबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून लोकांना घाबरवतात.

हा धोकादायक फंडा समजून घेणे आणि समजावून सांगणे खूप महत्त्वाचे असल्याचेही प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले. डिजिटल अटकेसारखी फसवणूक टाळण्यासाठी प्रतीक्षा करा, विचार करा आणि कृती करा या तीन चरणांचा अवलंब करण्याबद्दलही त्यांनी सांगितले. फसवणुकीचा कॉल येताच घाईघाईने कोणतीही पावले उचलू नका, तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. स्क्रीन शॉट्स घ्या आणि कॉल रेकॉर्डिंग करण्याचा पर्याय निवडा. दुसरी पायरी म्हणजे, ‘विचार करा’. कोणतीही सरकारी एजन्सी फोनवर माहिती मागवत नाही. तसेच व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा पैशाची मागणी करत नाही. ही बाजू सर्वप्रथम समजून घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

अनेकजण ‘डिजिटल अरेस्ट’चे बळी

पंतप्रधान म्हणाले की, सर्व वयोगटातील लोक ‘डिजिटल अरेस्ट’चे बळी ठरत आहेत. ऑनलाईन फसवणूककर्त्यांच्या या फंड्यामुळे कित्येक लोक आपल्या मेहनतीने कमावलेले लाखो ऊपये गमावत आहेत. सतर्कता बाळगूनही आपली फसवणूक झाली असल्यास ‘टेक अॅक्शन’ फॉलो करा. नॅशनल सायबर हेल्पलाईन 1930 डायल करून तातडीने तक्रार नोंदवा, असे पंतप्रधानांनी सांगितले.

अॅनिमेशन आणि व्हर्च्युअल टुरिझम

आज अॅनिमेशन क्षेत्र हा असा उद्योग बनला आहे की तो इतर उद्योगांना बळ देत आहे. आजकाल व्हीआर पर्यटन खूप लोकप्रिय होत आहे. व्हर्च्युअल टूरद्वारे अजिंठा लेणी पाहता येतात. कोणार्क मंदिराच्या कॉरिडॉरमधून फेरफटका मारता येतो किंवा वाराणसीच्या घाटांचा आनंदही घेता येतो. पर्यटन स्थळांची व्हीआर टूर लोकांच्या मनात कुतूहल निर्माण करते. आज या क्षेत्रात अॅनिमेटर्स, स्टोरी टेलर, लेखक, व्हॉईस ओव्हर एक्सपर्ट, संगीतकार आणि गेम डेव्हलपर यांची मागणी वाढत आहे. लोकांना या सुविधा पुरविण्यासाठी देशातील तऊणांनी आपल्या सर्जनशीलतेचा विस्तार करण्यास सांगितले.

अॅनिमेशन क्षेत्रात क्रांती घडवा!

छोटा भीमप्रमाणेच इतर अॅनिमेटेड मालिका कृष्णा, मोटू-पतलू, बाल हनुमान यांचेही जगभरात चाहते आहेत. भारतीय अॅनिमेटेड पात्रे आणि चित्रपट त्यांच्या आशय आणि सर्जनशीलतेमुळे जगभरात पसंत केले जात आहेत. भारत अॅनिमेशनच्या क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. भारतातील गेमिंग स्पेसही वेगाने वाढत आहे. भारतीय खेळही जगभर प्रसिद्ध होत आहेत, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली.

फिटनेस जागरूकतेवरही भाष्य

देशातील लोक फिटनेसबद्दल अधिक जागरूक होत आहेत. शाळाही तंदुरुस्तीवर भर देत आहेत. ‘फिट इंडिया स्कूल हावर’ हादेखील एक अनोखा उपक्रम आहे. अनेक शाळा पहिल्या तासिकेमध्ये फिटनेस उपक्रम राबवत आहेत. ‘मन की बात’च्या श्रोत्यांनी मला आपले अनुभव पाठवले आहेत. काही लोक खूप मनोरंजक प्रयोग करत आहेत. कौटुंबिक फिटनेस ही पद्धतही दृढ होत आहे. काही लोक प्रत्येक शनिवार व रविवार एक तास कौटुंबिक फिटनेस क्रियाकलापासाठी समर्पित करतात. तर काही कुटुंबे आपल्या मुलांना पारंपरिक खेळ शिकवत असल्याचे अनुभवही आपल्याशी शेअर करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article