इंग्लंड कसोटी संघात बेथेल नवा चेहरा
वृत्तसंस्था / ख्राईस्टचर्च
यजमान न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघांची घोषणा करण्यात आली. इंग्लंड संघामध्ये जेकब बेथेल हा नवा चेहरा आपले कसोटी पदार्पण करणार आहे.
अलिकडेच ऑस्ट्रेलिया आणि विंडीज विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेसाठी जेकॉब बेथेलने इंग्लंड संघात स्थान मिळविले होते. ओव्हलच्या मैदानावरील सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते. मात्र तो कसोटी क्रिकेटमध्ये अननुभवी आहे. 2022 साली झालेल्या आयसीसीच्या पुरुषांच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड संघातून खेळताना 21 वर्षीय बेथेलने 34.16 धावांच्या सरासरीने 205 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडचे जेमी स्मिथ आणि जॉर्डन कॉक्स हे जखमी असल्याने इंग्लंडच्या निवड समितीने ऑलिपॉपकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. बेन स्टोक्स कर्णधार राहिल. उभय संघातील पहिल्या कसोटीला येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.
इंग्लंड संघ: क्रॉले, डकेट, बेथेल, रुट, ब्रुक, ऑली पॉप, स्टोक्स (कर्णधार), ओक्स, अॅटकिनसन, कार्से आणि शोएब बशीर.