म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून रोहित पाटील यांना शुभेच्छा
10:38 AM Nov 11, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांची भेट घेतली. तासगावात त्यांची भेट घेऊन सीमावासियांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सीमाप्रश्न महाराष्ट्र सरकारसमोर मांडण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, चंद्रकांत कोंडुसकर, सचिन केळवेकर, किरण हुद्दार, राष्ट्रवादी काँग्रेस अभियंता सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित देसाई, निखिल देसाई, जोतिबा पाटील, आनंद पाटील आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article