For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

12:01 PM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
Advertisement

पंतप्रधानांनी ’ट्विट’ द्वारे केली कार्याची वाखाणणी : कुलदेवी, ग्रामदेवाचे घेतले आशीर्वाद

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वाढदिनी काल बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील भाजप नेते, मंत्री, उद्योगपती, राज्यातील भाजपसह अन्य पक्षांचे नेते, पक्षपदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांना सुयश, दीर्घायुष लाभण्याचे आशीर्वाद दिले. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलेल्या शुभेच्छा संदेशात, ‘गोव्याला एका सर्वांगसुंदर आणि विकसित राज्याच्या दिशेने नेतानाच समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे चाललेले प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहेत’, असे म्हटले आहे. या कार्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

कुलदेवी, ग्रामदेवाचे घेतले आशीर्वाद

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी सकाळी सर्वप्रथम कोठंबी येथील ग्रामदेव श्रीचंद्रेश्वर देवस्थानात जाऊन सपत्नीक अभिषेक केला. त्यानंतर कुडणे येथे कुलदेवता श्रीसातेरी मंदिरातही त्यांनी अभिषेक करून देवदेवतांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्यांनी तमाम गोमंतकीयांना सुख, शांती, समाधान प्राप्तीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर सकाळी 8 ते 9 या वेळेत त्यांनी सांखळी येथील निवासस्थानी जनतेच्या शुभेच्छा स्वीकारल्या. तेथून त्यांनी फोंडा हवेली येथे भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपो यांच्या प्रचारबैठकीस उपस्थिती लावून नागरिकांशी संवाद साधला. कुर्टी येथे गुऊकूल शाळेत कोपरा बैठकीत मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी, लोकांनी मतदान करून मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला भरभरून आशीर्वाद द्यावे, असे आवाहन केले.

दुपारी त्यांनी आल्तिनो येथील महालक्ष्मी बंगल्यावर उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकारल्या. त्यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, माजी खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, मंत्री विश्वजित राणे, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, आमदार दिव्या राणे, जेनिफर मोन्सेरात, मायकल लोबो, दाजी साळकर, संकल्प आमोणकर, जीत आरोलकर, नीलेश काब्राल, प्रेमेन्द्र शेट, ऊडाल्फ फर्नांडीस, आंतोन वास, गणेश गावकर, माजी आमदार दामू नाईक, संजीव देसाई, महादेव नाईक, महापौर रोहित मोन्सेरात, समाजकार्यकर्ते सुदीप ताम्हणकर, मधु नाईक, आदींचा समावेश होता. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सकाळी मडगाव येथील भाजप कार्यालय तसेच सायंकाळी म्हापसा येथील भाजप कार्यालयातही भेट देऊन जनतेच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

Advertisement
Tags :

.