महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेनसन, रिना, विजेते

10:16 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोची : रविवारी येथे झालेल्या 2024 च्या कोची स्पाईस कोस्ट मॅरेथॉनमध्ये केरळच्या सी.बी. बेनसनने पुरुष विभागातील तर रिना मनोहरने महिलांच्या विभागातील विजेतेपद मिळविले.42.2 कि.मी. पल्याच्या या मॅरेथॉनमध्ये बेनसनने 3 तास 00.42 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद पटकाविले. गेल्या दोन स्पर्धांमध्ये बेनसनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. जस्टिनने दुसरे तर श्रीनिधी श्रीकुमारने तिसरे स्थान मिळविले. महिलांच्या विभागात रिना मनोहरने 04.50.06 अवधी नोंदवित अजिंक्यपद पटकाविले. मेरी जोशेने दुसरे तर निलिना बाबूने तिसरे स्थान पटकाविले. हाफ मॅरेथॉनमध्ये के. एम. साजितने सलग तिसऱ्यांदा जेतेपद मिळवून हॅट्ट्रीक साधली. महिलांच्या विभागात ए. के. रमाने विजेतेपद तसेच जेसिना खानीने दुसरे आणि बिस्मा  ऑगेस्टिनने तिसरे स्थान पटकाविले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article