महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला बेंगळूर न्यायालयाचे समन्स

11:43 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रचार सभा शालेय परिसरात घेण्याचे प्रकरण : आज सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेश

Advertisement

पणजी : कर्नाटकातील मागील विधानसभा निवडणुकीतील प्रचारासंदर्भात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांना बेंगळूरूच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी समन्स जारी केला आहे. आजच्या आज जातीने सुनावणीच्यावेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सुलक्षणा प्रमोद सावंत या आज बेंगळूरला रवाना होत आहेत. कर्नाटकात गतवर्षी झालेल्या निवडणुकीदरम्यान सुलक्षणा सावंत या गोव्याच्या सीमेवर असलेल्या काही भागात  भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या होत्या. यादरम्यान सध्या सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यावरील सुनावणी आता बेंगळूर येथे होणार आहे. निवडणुकी प्रचार दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सौ. सावंत यांनी एका प्रचार सभांमध्ये मार्गदर्शन केले होते व ती सभा आयोजकांनी शालेय परिसरात घेतली होती. केवळ या आरोपासाठी  सुलक्षणा सावंत यांना न्यायालयात जातीने हजर रहा, असे समन्स बजावले आहेत. त्यानुसार त्या आज बेंगळूरला न्यायालयात हजर राहतील.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article