महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बंगाली टायगर्स, सरकार स्पोर्ट्स संघ विजयी

10:17 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महांतेश कवटगीमठ चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : मराठा स्पोर्ट्स क्लब आयोजित महांतेश कवटगीमठ चषक ऑल इंडिया टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बंगाली टायगर्स, सरकार स्पोर्ट्स, राहुल के. आर. शेट्टी रायगड संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. साकीब, थॉमस डायस, अमोल निलगुडे, अबु बकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आज सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आर्यन स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडीबाद 69 धावा केल्या. त्यात साकीबने 47 तर मनोजने 10 धावा केल्या. सरकार स्पोर्ट्सतर्फे सतीश जाधव यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सरकार स्पोर्ट्सने 5.1 षटकात 2 गडीबाद 72 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात प्रथमेश चाव व अमोल निलगुडे यांनी प्रत्येकी 21 तर सुरज जाधवने 14 धावा केल्या. आर्यनतर्फे रवीने 1 गडीबाद केला. दुसऱ्या सामन्यात राहुल के. आर. शेट्टी रायगडने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडीबाद 132 धावा केल्या. त्यात शाहीद शेखने 50, सुनील चावरेने 37, थॉमस डायसने 21 धावा केल्या. बालाजी स्पोर्ट्सतर्फे शरद, सादीक, पांडूने प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बालाजी स्पोर्ट्स हलगाने 8 षटकात 5 गडीबाद 76 धावा केल्या. त्यात पिंटू सालगुडेने 28, अवनिश उपाध्येने 16 धावा केल्या.

Advertisement

तिसऱ्या सामन्यात सरकार स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडीबाद 91 धावा केल्या. त्यात राजा शर्माने 35, तर अमोल निलगुडेने 25 धावा केल्या. कृष्णा स्पोर्ट्सतर्फे तन्वीर तोगट्टीने 2, मनोज रावळू यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कृष्णा स्पोर्ट्सने 8 षटकात 8 गडीबाद 42 धावा केल्या. त्यात आर्यनने 10 धावा केल्या. सरकारतर्फे कावेरीसिंग चाव, सतीश जाधव, जत्तीन ठक्कर यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. चौथ्या सामन्यात राहुल के. आर. शेट्टी रायगड संघाने प्रथम फलंदाजी करताना 7.1 षटकात सर्व गडीबाद 67 धावा केल्या. त्यात शाहीद शेखने 28, सागर रणपिसेने 17 धावा केल्या. बंगाली टायगर्सतर्फे मुतू नाईकने 3, अबु बकर, इजार, अनिल नाईकने प्रत्येकी 2 गडीबाद केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बंगाली टायगर्सने 7.1 षटकात 3 गडीबाद 68 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात अबु बकरने 21, सतीशने 17 धावा केल्या. राहुल के. आर. शेट्टीतर्फे हुसेन शेखने 2, तर सचिनने 1 गडीबाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे नागेश लंगरकांडे, विश्वनाथ चौगुले, प्रणय शेट्टी, रवी पुरेकर, बलराम, सारंग राघवचे, उत्तम शिंदे आदी मान्यवरांच्याहस्ते साकीब, थॉमस डायस, अमोल निलगुडे, अबु बकर यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.

मंगळवारचे सामने : आरसीसी अनगोळ वि. पी. जे. स्पोर्ट्स यांच्यात सकाळी 9 वा., पांडूरंग सीसी वि. निशान स्पोर्ट्स यांच्यात सकाळी 10.30 वा., मराठा स्पोर्ट्स ग्रामीण वि. पहिल्या सामन्यातील विजेता, सोमनाथ डेव्हलपर्स वि. दुसऱ्या सामन्यातील विजेता यांच्यात दु. 1.30 वा. खेळविण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article