बेलराइज इंडस्ट्रिजचा येणार आयपीओ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेलराइज इंडस्ट्रिज यांचा आयपीओ बुधवारी 21 मे रोजी गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 2150 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती आहे.
बेलराइज इंडस्ट्रिजचा समभाग ग्रे मार्केटमध्ये 13-14 रुपये प्रिमीयमसह व्यवहार करत होता. ही कामगिरी गुंतवणूकदारांचा समभागाला चांगला प्रतिसाद मिळण्याचे संकेत दर्शवत आहे. या आयपीओतून कंपनी 2150 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. ऑफर फॉर सेलचा समावेश नसणार आहे. 50 टक्के वाटा पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदार, 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि 35 टक्के वाटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहे. कंपनीने इशुची किंमत 85 रुपये ते 90 रुपये प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. गुंतवणूकदार कमीतकमी 166 समभागांकरीता बोली लावू शकतात. 21 मे रोजी खुला होणाऱ्या आयपीओत 23 मे पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.
बेलराइज इंडस्ट्रिज ही ऑटोमोटीव्ह कंपोनंट बनवणारी कंपनी आहे. जिचे मुख्यालय पुण्यात आहे. दुचाकी, तिचाकी, चारचाकी, व्यावसायिक वाहन आणि कृषी वाहन यांच्याकरीता सुरक्षिततेसंबंधीची प्रणाली व अभियांत्रिकी सेवा प्रदान करते. आर्थिक वर्ष 2024 मध्ये पहिल्या 9 महिन्यात कंपनीने 6013 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे. जो मागच्या वर्षाच्या समान अवधीत 5957 कोटी रुपये इतका होता. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 8008 कोटी रुपये इतके आहे.