For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगुंदी हिंद केसरीचे मानकरी तुर्केवाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न

11:18 AM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगुंदी हिंद केसरीचे मानकरी तुर्केवाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न
Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

बेळगुंदी येथील कलमेश्वर व्यायाम मंडळाच्यावतीने शिवाजीनगर बेळगुंदी येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस झालेल्या या शर्यतीत तुर्केवाडी येथील ज्योतिर्लिंग प्रसन्न या बैलजोडीने 2072 फूट 7 इंच इतके अंतर ओढून प्रथम क्रमांक पटकाविला व बेळगुंदी हिंद केसरीचे मानकरी ठरले. शर्यतीचे उद्घाटन माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. अलीकडे ग्रामीण भागातही शेतकऱ्यांच्या गोठ्यात बैलजोडीची संख्या कमी झालेली पहावयास मिळत आहे. बैलगाडी शर्यत हा शेतकऱ्यांचा छंद आहे. शेतकरी आपल्या बैलांची अगदी आत्मीयतेने जोपासना करतात, असे मनोहर किणेकर यांनी सांगितले.

या शर्यतीमध्ये मुतगा बैलूर येथील भावकेश्वरी प्रसन्न या बैलजोडीने 2043 फूट 10 इंच इतके अंतर ओढून द्वितीय क्रमांक मिळविला. 2007 फूट 6 इंच इतके अंतर ओढून चव्हाटा प्रसन्न तुर्केवाडी, तडशीनहाळ या बैलजोडीने तृतीय क्रमांक मिळविला. चौथा क्रमांक ज्योतिर्लिंग प्रसन्न तुर्केवाडी (1989 फूट 11 इंच), पाचवा बाळूमामा प्रसन्न यमेटी (1962 फूट 5 इंच), सहावा ज्योतिर्लिंग काळम्मा देवी प्रसन्न कुप्पटगिरी, सातवा ब्रह्मलिंग प्रसन्न सुरुते संतिबस्तवाड, आठवा तडशीनहाळ तुर्केवाडी, नववा किणये सांबरे, दहावा बेटगेरी, अकरावा माउली प्रसन्न बेळगुंदी, बारावा मजगाव नेसरगी, तेरावा तडशीनहाळ निडगल, चौदावा रवळनाथ प्रसन्न बेळगुंदी कुदनूर व पंधरावा रवळनाथ बेळगुंदी हेरे यांनी मिळविला. पुंडलिक सुतार यांच्या अध्यक्षतेखाली दशरथ पाऊसकर, महेश पाऊसकर, मारुती शिंदे, शिवाजी चिरमुरकर आदींच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन ग्रामस्थ पंचकमिटीचे अध्यक्ष किरण मोटणकर यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.