For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगुंदी विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

10:24 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगुंदी विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते, बेळगुंदी विभागीय क्रीडा स्पर्धा बिजगर्णी येथे झाल्या. कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. दीपप्रज्वलन अध्यक्ष वसंत अष्टेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्राम पंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, नूतन अध्यक्षा रेखा नाईक व उपाध्यक्ष नामदेव मोरे, पिडीओ उपस्थित होते. प्रभारी मुख्याध्यापक पी. के. पाटील यांनी शाल, श्रीफळ देवून मान्यवरांचे स्वागत केले. सहशिक्षक सी. टी. कोलकार यांनी सुत्रसंचालन केले. क्रीडाध्वजरोहण ग्रा.पं.अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडाज्योतीला मराठी शाळा बेळगुंदी यांच्याकडून मानवंदना देण्यात आली. फाईलचे वाटप करुन क्रीडास्पर्धांना फित कापून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत सरकारी मराठी शाळा यांना घवघवीत यश लाभले. यावेळी बेळगुंदी क्रेंदाच्या सीआरपी सुवर्णा रेडेकर, शाळा सुधारणा समितीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व मुख्याध्यापक, सहशिक्षक, क्रीडाशिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

बिजगर्णीचे घवघवीत यश

बेळगुंदी विभागीय क्रीडा स्पध्घ्xत बिजगर्णी येथील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 16 व 17 ऑगस्ट रोजी झालेल्या स्पर्धेत खो-खो क्रीडा प्रकारात मुले, मुली प्रथम, रिले मुली प्रथम, 400 मी. धावणे ऐश्वर्या अष्टेकर प्रथम, थाळीफेक लक्ष्मण जाधव-प्रथम, कुस्ती 38 किलो वजनात अभिजित एस. कांबळे-प्रथम, 40 किलो वजनी गटात लक्ष्मण जाधव-प्रथम, उंच उडी सोहम तारिहाळकर - प्रथम, बुद्धीबळमध्ये आयुष्य एम. पाटील-प्रथम, 200 मी. धावणे प्रकारात ऐश्वर्या अष्टेकर-व्दितीय, गोळाफेक लक्ष्मण जाधव-द्वितीय, उंचउडी मंथन अष्टेकर-द्वितीय, थाळीफेक श्वेता पाटील-द्वितीय, लांबउडी मंथन अष्टेकर-द्वितीय, रिले 400 मी. धावणे मुलांमध्ये तृतिय, थाळीफेकमध्ये अमर बिर्जे-तृतिय, उंचउडीमध्ये ऐश्वर्या एम. अष्टेकर-तृतिय, 200 मी. धावणे लक्ष्मण ए. जाधव याने द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.