बेळगाव विभागीय हॉकी संघ उपविजेता
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने धारवाड येथील विभागीय हॉकी स्पर्धेमध्ये बेळगाव माध्यमिक मुलींच्या संघाने द्वितीय स्थान पटकावले. मुलींच्या माध्यमिक गटामधील उपांत्य सामन्यामध्ये बेळगाव विभागीय संघाने चिकोडी विभागीय संघाचा 3-0 असा पराभव केला. बेळगावतर्फे अस्मी कामत, सानिका पाटील आणि आऊषी बसुर्तेकर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. तसेच अंतिम सामन्यांमध्ये डी. वाय. इ. एस. धारवाड संघाकडून त्यांना 0-4 असा पराभव स्वीकारावा लागल्याने बेळगाव विभागीय संघाला उपविजेतेपद मिळाले. बेळगाव विभागीय संघाकडून खेळताना जी. जी. चिटणीस स्कूलच्या वैष्णवी इटनाळ, सेजल भावी, श्रेया गोलीहळी, अस्मी कामत, भूमी लटकन, आऊषी बसुर्तेकर, तनिष्का असलकर, महेक बिस्ती, वैष्णवी नाईक, अतिथी शेट्टी, निशा दोडमणी तसेच ताराराणी खानापूर स्कूलच्या सानिका पाटील, श्रेया पाटील, नंदिनी गुरव, नेहा ठोंमरी, प्रेरणा पाटील, आदिती ठक्कर, अनुराधा मयेकर यांचा सहभाग होता. तसेच प्राथमिक मुलींच्या हॉकी गटामध्ये उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये बेळगाव संघाला चिकोडी संघाकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला तर बागलकोट संघाने 3-0 ने विजयी झाल्यामुळे त्यांना तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. वरील दोन्ही संघाना क्रीडाशिक्षक जयसिंग धनाजी, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. नवीन शेट्टीगार, अॅड. चंद्रहास अणवेकर तसेच क्रीडाशिक्षिका अश्विनी पाटील, मुख्याध्यापक राहुल जाधव यांचे प्रोत्साहन लाभत आहे