राज्य हॉकी स्पर्धेत बेळगावला उपविजेतेपद
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित हासन येथे झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत बेळगाव संघाने राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत मुलींच्या गटातने उपविजेतेपद पटकाविले. मुलींच्या 17 वर्षांखालील गटातील पहिल्या सामन्यात डीवायईएस कोडुगु संघाचा 5-1 असा पराभव करीत विजय संपादन केला.दुसऱ्या सामन्यात बेळगावने बेंगळूरचा 7 -0 असा तर तिसऱ्या सामन्यात बेळगावने गुलबर्गाचा 5 -1 असा विजय मिळविला. निर्णायक सामन्यात म्हैसूरने बेळगावचा 4-1 असा पराभव केला.या हॉकी स्पर्धेत म्हैसूरने जेतेपद तर बेळगावला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संघामध्ये जी. जी. चिटणीस शाळेची सेजल भावी,वैष्णवी इटनाळ,श्रेया गोलाहळ्ळी, महेक बिस्ती ,वैष्णवी नाईक, तर मराठा मंडळच्या सानिका पाटील, श्रेया पाटील यांचा समावेश होता. क्रीडाशिक्षक जयसिंग धनाजी,अश्विनी पाटील, चंद्रकांत गोमाण्णाचे,मुख्याध्यापिका डॉ.नवीना शेट्टीगार,राहुल जाधव, के. व्ही. कुलकर्णी अध्यक्ष अॅड.चंद्रहास अणवेकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.