कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत बेळगावची बाजी

10:48 AM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कर्नाटक ऑलिम्पिक संघ, इंडीया तायक्वांदो, कर्नाटक क्रीडा प्रधिकार मान्यता प्राप्त कर्नाटक तायक्वांदो मार्गदर्शनाखाली बेंगळुरू जिल्हा तायक्वेंदो संस्था यांच्या सयुक्त विद्यमाने 42 व्या. राज्यस्तरीय सब ज्युनियर, पॅडेट, ज्युनियर व सिनियर तायक्वांदो स्पर्धेचे बेळगाव जिल्हा तायक्वोदो संघटनेच खेळाडूंचे घवघवीत यश. कोरमंगला इंडोर स्टेडियम बेंगळुरू येथे  बेळगाव जिल्हाचे प्रतिनिधित्व करत यक्षित युवा फाउंडेशनचा राव युवा अपॅडमीच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत सुब-जूनियर विभागात 41 किलो वजनी गटात घगन शिवपूजिमठने कांस्य पदक, 8 वर्षांखालील गटात ईशान पाटील व स्तुती टूमरी यानी सुवर्ण पदक, 10 वर्षांखालील गटात आद्वित गोंदने रौप्य पदक, वेदांत खडबडीने कांस्य पदक, 12 वर्षांखालील गटात श्राव्या शानभागने कांस्य पदक, मोहम्मदसोहब चंदशाहने कांस्य पदक मिळवले.

Advertisement

पॅडेट 14 वर्षांखालील गटात प्रज्वल गुडसने रौप्य पदक मिळवले. ज्युनियर 17 वर्षांखालील गटात तनीश रावने कांस्य पदक मिळवले. तसेच, सब-ज्युनियर मुलींच्या व्यक्तिगत पूम्स गटात ओविया चौधरीने कांस्य पदक पटकाविली या स्पर्धेत बेळगाव जिह्यातील स्पूर्ति टालुकरने सब-ज्युनियर 29 किलो वजनी गटात, पवनराज दड्डीकरने सब-ज्युनियर 38 किलो वजनी गटात, अवनीश गडदेनं सब-ज्युनियर 25 किलो वजनी गटात, आयुष साळुंकेने पॅडेट 33 किलो वजनी गटात, सान्वी वासोजीने पॅडेट 41 किलो वजनी गटात, आऊष टुमरीने पॅडेट 53 किलो वजनी गटात, निशिका पात्राने पॅडेट 51 किलो वजनी गटात, आऊष हांजेनं पॅडेट 41 किलो वजनी गटात, मोहम्मदशफी चांदशहानं पॅडेट 41 किलो वजनी गटात भाग घेऊन उत्तम प्रदर्शन दिले. स्पर्धेत कर्नाटक राज्यातील प्रत्येक जिह्यातील उत्कृष्ट 2300 हून अधिक क्रीडापटूंचा सहभाग होता. राव युवा अपॅडमीच्या मुलांच्या कामगिरी बद्दल बेळगाव जिल्हा तायक्वांदो संस्थेचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय पंच महादेव मुत्नाळे आणि सरचिटणीस, आंतरराष्ट्रीय पंच अॅङ प्रभाकर शेडबाळे यांनी कौतुक केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article