महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावला विशेष औद्योगिक दर्जा मिळेल

11:07 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जीआयटीमध्ये सीआयडीआयच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष अनंत मंडगी यांचे प्रतिपादन

Advertisement

बेळगाव : केएलएस जीआयटी कॉलेजमध्ये सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी डिझाईन अँड इनोव्हेशन सेंटरचे डासाल्ट सिस्टीमच्या सहकार्याने उद्घाटन करण्यात आले. डासाल्ट सिस्टीम सोल्युशन लॅबचे सीईओ सुदर्शन मोगसाळे यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन झाले. यावेळी धारवाड येथील टाटा मोटर्सचे विभागप्रमुख प्रदोष मोहंती व केएलएसचे अध्यक्ष अनंत मंडगी उपस्थित होते.

Advertisement

डासाल्ट सिस्टीमने प्रगती 

सॉफ्टवेअर्स स्थापन केली आहेत. सिम्युलेशनद्वारे यांत्रिक भाग तयार केलेल्या मशीनचे पूर्वऑपरेशनल ज्ञान, सुट्या भागांचा टिकाऊपणा व त्यांची क्षमता या सॉफ्टवेअरमुळे पूर्वनिश्चित करता येईल. याचा वापर उद्योगांमधील नवीन सुट्या भागांचे डिझाईन करण्यासाठी होणार आहे. यामुळे पैसा व वेळ वाचून औद्योगिक उत्पादनाचा टिकाऊपणा वाढेल, असे सुदर्शन मोगसाळे यांनी सांगितले. प्रदोष मोहंती यांनी टाटा मोटर्सबद्दल माहिती दिली. केएलएस जीआयटीचे प्राचार्य डॉ. एम. एस. पाटील म्हणाले, जीआयटीमध्ये कार्यरत असलेल्या अॅस्ट्रोफिजिक्स, व्हीएलसीआय, कम्पोझिट मटेरियल्स अँड रिव्हर्स इंजिनिअरिंग, नॅनो सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजी यासारख्या शाखांनी संशोधनात चांगली कामगिरी बजावल्याचे सांगितले. मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. हर्षित कुलकर्णी यांनी इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. अॅड. अनंत मंडगी म्हणाले, सीआयडीआयच्या स्थापनेमुळे बेळगावला विशेष औद्योगिक दर्जा मिळेल, असे सांगितले. जीआयटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य राज बेळगावकर यांनी स्वागत केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article