For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव वॉरियर्स, लेक व्ह्यू टायटन्सची विजयी सलामी

10:17 AM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव वॉरियर्स  लेक व्ह्यू टायटन्सची विजयी सलामी
Advertisement

बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित 12 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी बेळगाव वॉरियर्सने साई फार्म्स स्पोर्टस क्लबचा 4 गड्यांनी तर लेक व्ह्यू टायटन्सने दळवी थंडर्सचा सुपरओवरमध्ये पराभव करून विजयी सलामी दिली. अल्तमश सनदी, सचिन तलवार यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. भगवान महावीर मैदानावरती आयोजित राजू दो•ण्णवर चषक लिटल्स चॅम्पियन्स लीग 12 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट क्लबच्या उद्घाटन प्रसंगी व चषक अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विनोद दो•ण्णवर, सचिन शिंदे, चंदन कुंदरनाड, अमरदीप पाटील, आंनद करडी, संघमालक दर्शन गडकरी, विशाल च•ाrचल, रोहित पोरवाल, विश्वजित उप्पालदिनी, अमोल दळवी, मसूद महारूफ आदी मान्यवर उपस्थित होते. विनोद दो•ण्णवर यांच्या हस्ते चषकांचे अनावरण करण्यात आले. गुरुवारी सकाळी पहिल्या सामन्यात साई फार्म्स स्पोर्टस् क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 136 धावा केल्या. त्यात विश्रृत कुंदरनाडने 2 चौकारसह 32, महम्मद हमजाने 3 चौकारासह 22 धावा केल्या. बेळगाव वॉरियर्सतर्फे आयुष उगारने 17 धावात 2, अल्तमशने 31 धावात 2 तर आरूष जंगीने 1 गडी बाद केला.

Advertisement

प्रत्त्युत्तरादाखल खेळताना बेळगाव वॉरियर्सने 22 षटकात 6 गडी बाद 138 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात ओजस गडकरीने 3 चौकारसह नाबाद 33, श्लोक च•ाrचालने 2 चौकारासह 15 तर कबीर पठाणने 2 चौकारसह 14 धावा केल्या. साई फार्म्सतर्फे विश्रृत कुंदरनाड व महम्मद हमजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुपारीच्या दुसऱ्या सामन्यात  लेक व्ह्यू टायटनने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 165 धावा केल्या. त्यात सचीन तलवारने आक्रमक फलंदाजी करताना 15 चौकारांसह 69 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या. दळवी थंडर्सतर्फे आरूष मावळणकरने 18 धावात 2 तर आरती कदम, झुयान सलीमवाले, योगेश्वर राणा व के. आनंदाचे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना दळवी थंडर्सने 25 षटकात 7 गडी बाद 165 धावा करून सामना टाय झाला. त्यात महम्मद जियान सलीमवालेने 10 चौकारांसह नाबाद 73, अंगद दळवीने 2 चौकारासह 15 धावा केल्या.  लेक व्ह्यूतर्फे आयुष उप्पालदिनीने 29 धावात 3 गडी बाद केले. सामना टाय झाल्याने पंचांनी सुपरओवर नियमाचा वापर केला. त्यामध्ये दळवीने प्रथम फलंदाजी करताना 1 षटकात 1 गडी बाद 10 धावा केल्या. त्यात जियानने 6 तर अंगदने 3 धावा केल्या. 10 धावांचे उद्दिष्ट घेऊन खेळताना  लेक व्यहू संघाने 1 षटकात 1 बाद 10 धावाच करून परत सुपरओवरकडे वाटचाल केली. दुसऱ्या सुपरओवरमध्ये  लेक व्यहूने 1 षटकात 8 धावा केल्या. 8 धावाचे उद्दिष्ट घेऊन खेळताना दळवीने 1 षटकात 6 धावाच केल्याने हा सामना दळवी थंडर्सला 2 धावांनी गमवावा लागला.

Advertisement

Advertisement
Tags :

.