महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसची बेळगावला प्रतीक्षाच

10:42 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बहुप्रतीक्षेत असलेल्या इलेक्ट्रिक बसची बेळगाव आगाराला प्रतीक्षा लागून राहिली आहे. मागील वर्षापासून इलेक्ट्रिक बसची एंट्री अद्याप लांबणीवर पडली आहे. राज्यातील बेंगळूर, म्हैसूर, दावणगेरे आणि दक्षिण कर्नाटकातील इतर काही भागात इलेक्ट्रिक बस धावू लागल्या आहेत. मात्र, बेळगाव विभागाला केवळ प्रतीक्षाच करावी लागली आहे. सरकारने बेंगळूरनंतर बेळगाव, चिक्कमंगळूर, शिमोगा, हुबळी, मंगळूर आदी शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप बेळगाव यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या बससेवेवरच कारभार सुरू आहे. प्रदूषण टाळून खर्चाची बचत करण्यासाठी परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, सध्या त्या मर्यादित शहरापुरतीच असल्याचे दिसत आहे. राज्यात सर्वाधिक महसूल देणाऱ्या बेळगाव शहरालाही या बसची प्रतीक्षाच करावी लागली आहे.

Advertisement

चार्जिंग स्टेशनचा अभाव आणि इतर कारणांमुळे इलेक्ट्रिक बसेस थांबल्या आहेत. प्रथमत: चार्जिंग स्टेशनचा मार्ग मोकळा झाल्यानंतर इलेक्ट्रिक बस मोठ्या संख्येने दाखल होतील, अशी आशा आहे. मात्र सध्या बेंगळूर, म्हैसूर, दावणगेरे या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस सेवा देऊ लागल्या आहेत. त्यामुळे बेळगावातील सर्वसामान्य प्रवाशांनाही इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा लागली आहे. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, गदग,हावेरी आणि बागलकोट जिल्ह्यांसाठी इलेक्ट्रिक बससाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान, एका खासगी संस्थेने अधिक रकमेची मागणी केली होती. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रेंगाळली होती. येत्या काळात तरी इलेक्ट्रिक बस दाखल होईल का? हेच आता पाहावे लागणार आहे.इंधन वाढीमुळे इलेक्ट्रिक बस परिवहनला आधार ठरणार आहेत. इंधन बचतीमुळे परिवहनच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. मात्र, मागील वर्षभरापासून एकही इलेक्ट्रिक बस दाखल झालेली नाही. केवळ इलेक्ट्रिक बसबाबत चर्चा आणि केवळ हवाच झाली. प्रत्यक्षात मात्र बेळगाव विभाग इलेक्ट्रिक बसपासून चार हात लांबच राहिला आहे.

Advertisement

प्रायोगिक तत्त्वावर लवकरच प्रारंभ

बेंगळूर आणि इतर शहरात इलेक्ट्रिक बस सुरू झाल्या आहेत.बेळगावातही इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच प्रायोगिक तत्त्वावर बस सोडण्यात येतील. त्यानंतर या बससेवेलाही प्रारंभ होईल.

-अनंत शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article