बेळगाव क्रीडाशिक्षक संघ विजेता
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत प्रदर्शनीय सामन्यात बेळगाव क्रीडा शिक्षक संघाने व्रेडाई इलेव्हन संघाचा 14 धावांनी पराभव करीत साईराज चषक पटकाविला. उमेश बेळगुंदकरला सामनावीर तर आयुष सरदेसाईला उदयोन्मुख खेळाडू निवडण्यात आले. व्हॅक्सीन डेपो मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेळगांव क्रीडाशिक्षक संघाने 8 षटकात 3 बाद 86 धावा केल्या त्यांच्या उमेश बेळगुंदकरने 39, सचिन कुडचीने 23, धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना व्रेडाई संघाने 8 षटकात 7 बाद 72 धावा केल्या. त्यांच्या रोशनने 31, प्रविणने 12 धावाचे योगदान दिले.बेळगांव क्रीडा शिक्षक संघातर्फे सचिन कुडची, जयसिंग धनाजी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे अमर सरदेसाई, महेश फगरे, आनंद चव्हाण, विजय धामणेकर, निखील एम, शितल वेसणे, गजानन फगरे, पी वाय कदम, रोहित फगरे, विठ्ठल कारेकर या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.