बेळगाव क्रीडाशिक्षक संघ, क्रेडाई अंतिम फेरीत
साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय खुली टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
बेळगाव : व्हँक्सिन डेपो मैदानावर साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय खुली टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी बेळगाव क्रीडा शिक्षक संघ व क्रीडा इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धेचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्घाटनाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हेस्काम संघाने 8 षटकात 4 बाद 67 धावा केल्या त्यांच्या अमर सरदेसाईनी 24 धावांचे योगदान दिले बेळगांव क्रीडा शिक्षक संघाच्यावतीने उमेश बेळगुदकरने दोन गडी, सचिन कुडची जयसिंग धनाजी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. प्रत्युत्तर दाखल खेळताना बेळगाव क्रीडा शिक्षक संघाने 6.4 षटकात 3 बाद 70 धावा करीत सामना 7 गड्यांनी जिंकला त्यांच्या देवेंद्र कुडचीने 39, सचिन कुडचीने 17 धावांचे योगदान दिले हेस्कॉमतर्फे आयुष सरदेसाई व गुरु यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना फौंड्रीक्लस्टरने 8 षटकात 3 बाद 82 धावा केल्या त्यांच्या राहुल एचने 42, प्रविणने 16 धावांचे योगदान दिले क्रेडाई संघातर्फे वल्लभने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तर दाखल करताना क्रीडा इलेव्हन ने 8 षटकात तीन बाद 87 धावा करीत सामना सात गाडीने जिंकला त्यांच्या प्रवीणने 37 कपिल कदमने 24 धावा केल्या दोन गडी अमरदीप पाटीलने एक गडी बाद केला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, अमर सरदेसाई महेश फगरे,मल्लीकार्जुन जगजंपी, नारायण फगरे, क्रीडा भारतीचे राज्य सचिव अशोक शिंत्रे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, युवराज हुलजी,विजय धामणेकर,निखील एम,शितल वेसणे गजानन फगरे, पी वाय कदम,रोहित, विठ्ठल कारेकर, प्रशांत बेकवाडकर,धिरज देसाई, बी. सी. मन्नोळकर,दीपक कलघटगी, या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, श्री छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पुजन व आकाशात फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघांना देण्यात येणाऱ्या आकर्षक चषकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी साईराज स्पोर्ट्स क्लबचे सदस्य श्रीधर पवार मराठी समालोचक मोहन वाळवेकर नामवंत क्रिकेट खेळाडू विजय देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज जाधव यांनी केले.