महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव स्पोर्ट्स क्लब, तेजल शिरगुप्पी विजयी

10:27 AM Dec 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा, वसंत कुंदर, पार्थ पाटील ‘सामनावीर’

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ ने ब चा 8 गड्यांनी, तेजल शिरगुप्पी क्रिकेट अकादमी अ ने बीडीके स्पोर्ट्स फौंडेशनचा पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. शतकवीर वसंत कुंदर व पार्थ पाटील यांना ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. ऑटोनगर येथील केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब ब ने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्वगडी बाद 205 धावा केल्या.

Advertisement

त्यात माधव डी. ने 3 षटकार, 5 चौकारासह 65, आयुष पाटीलने 34, शशीधर शिंदेने 4 चौकारासह 25 तर नवीन संकपाळने 16 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे किरण बोकडेने 29 धावांत 3, पार्थ पाटीलने 43 धावांत 3, राकेश पाटीलने 46 धावांत 2 तर ओम व हर्ष पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 29.1 षटकात 2 गडी बाद 209 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात पार्थ पाटीलने 10 चौकारांसह नाबाद 73, सुदीप सातेरीने 1 षटकार 8 चौकारांसह 62, सुजय सातेरीने 7 षटकार 3 चौकारांसह नाबाद 60 धावा केल्या.हुबळीतर्फे ध्रुव बामणेने 2 गडी बाद केले.

हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात तेजल शिरगुप्पी अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी बाद 302 धावा केल्या. त्यात वसंत कुंदरने 7 षटकार, 7 चौकारांसह नाबाद 108 धावा करुन शतक झळकविले. त्याला राजेंद्र डी.ने 8 चौकारांसह 57, ध्रुव जी.ने 1 षटकार 5 चौकारांसह 37, गणेश नाईकने 19 तर साईनाथ राजोळीने 18 धावा केल्या. बीडीके स्पोर्ट्स फौंडेशनतर्फे आदित्य के., मलिकसाब शिरुर यांनी प्रत्येकी 2 गडी तर आकाश, अभिलाश, वसंत व अमर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीके फौंडेशनचा डाव 36.4 षटकात 138 धावांत आटोपला. त्यात आकाश कुलकर्णीने 60, सौरभ सामंतने 23, वैष्णव व अमर घाडी यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. तेजल शिरगुप्पीतर्फे ध्रुव वासुने 8 धावांत 2, नवीनने 29 धावांत 3 गडी बाद केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article