कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव स्पोर्ट्स क्लब अंतिम फेरीत

12:13 PM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित धारवाड विभागीय 14 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत बेळगाव स्पोर्ट्स क्लबने बुडीके स्पोर्ट्स फौंडेशन हुबळीचा 15 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली. सचिन तलवार, लक्ष्य खतायत यांना विभागून ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आले. हुबळी येथील केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 17 षटकात सर्व गडी बाद 175 धावा केल्या. त्यात सचिन तलवारने 8 चौकारांसह 68 तर लक्ष्य खतायतने 9 चौकारांसह 63 धावा केल्या. बीडीके स्पोर्ट्स फौंडेशनतर्फे रोहन शेखने 23 धावांत 3, आकाश गुब्बीने 28 धावांत 3, सज्जन गौडाने 4 धावांत 2 तर विहान भूषदने 33 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीके स्पोर्ट्सने 50 षटकात 8 गडी बाद 160 धावाच केल्या. त्यात रुहान शेखने 4 चौकारांसह 54, आरुश पुत्रनने 3 चौकारांसह 26, विहान भूषदने 21 तर श्रीजान गौडाने 20 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे ओम बानेने 27 धावांत 3, सुजल गोरल  कौशिक वेर्णेकर, अवणीश बस्तवाडकरने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article