कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव सकल मराठाचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना

12:02 PM Sep 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देऊन प्रत्यक्षात मोर्चात सहभागी होण्यासाठी बेळगाव येथून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळ रविवारी मुंबईला रवाना झाले. सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मोर्चास्थळी मनोज जरांगे-पाटील यांना बेळगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबाचे पत्र देण्यात येणार आहे. सकल मराठाचे रमाकांत कोंडुसकर, माजी नगरसेवक राजू बिर्जे, मोतेश बारदेशकर, अनंत पाटील, कृष्णा पन्हाळकर, अजय खलाटे पाटील, शिवम पन्हाळकर, राजेंद्र बैलूर, विनायक बिर्जे, ओमकार पन्हाळकर, गणेश शिंदोळकर, अंकुश केसरकर, चंद्रकांत कोंडुसकर, आनंद आपटेकर, राजकुमार मोरे मुंबईला रवाना झाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article