महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट
Advertisement

विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत बेळगाव उपविजेता

10:08 AM Oct 25, 2022 IST | Tarun Bharat Portal

धारवाडला विजेतेपद, बेळगावच्या 5 खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Advertisement

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

धारवाड येथे शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव विभागस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात धारवाड विभागीय संघाने बेळगाव विभागीय संघाचा 22-10 अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. या सामन्यात बेळगाव विभागाच्या सेंट झेवियर्स स्कूल यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बेळगाव विभागाच्या 5 बास्केटबॉलपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विभागीय संघात निवड झाली आहे.

धारवाड येथील मल्लसर्ज इन्स्टिटय़ूट ऑफ धारवाडच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या विभागीय बास्केटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बेळगाव विभागीय संघाने बागलकोट विभागीय संघाचा 34-9 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत बेळगाव संघाने विजापूर संघाचा 36-3 अशा गुणफरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम फेरीत बलाढय़ धारवाड संघाने 22-10 अशा गुणफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. बेळगाव विभागातील आदित्य पाटील, विनायक दोडमनी, चिन्मय उम्मी, फ्रान्सिस फर्नांडिस, सरोज सावंत, रेहान नाईक, महंमद हमीद बरगार, सिद्धार्थ गच्ची, रेहान बाळेकुंद्री, उजर शेख, विवेकानंद रालपाती, साईराज पाटील या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले. त्यांना क्रीडाशिक्षक चेस्टर रोजारिओ, मानस नायक व बास्केटबॉल प्रशिक्षक व्ही. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Advertisement
Next Article