For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव रोटरी वेणुग्राम मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

10:10 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव रोटरी वेणुग्राम मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
Advertisement

अनिकेत खाडे, निर्वी कालकोप्पी विजेते : दोन हजारहून अधिक स्पर्धकांचा सहभाग

Advertisement

बेळगाव : अंमली पदार्थांपासून बचाव याच्या प्रसारासाठी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आयोजित केलेल्या रोटरी वेणुग्राम हॉफ मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात अनिकेत खाडे तर महिलांमध्ये निर्वी कालकोप्पी यांनी 10 किलोमीटर स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. सीपीएड मैदानावर आयोजित केलेल्या बेळगाव रोटरी मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन एमएलआयआरसीचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, विजया हॉस्पिटलचे डॉ. रवी पाटील यांच्या हस्ते ध्वज उंचावून करण्यात आले. विविध गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. 10 किलोमीटर स्पर्धेत पुरूष गटात अनिकेत खाडे प्रथम क्रमांक, मुबारक दांतिरी दुसरा तर अजित राठोडने तिसरा क्रमांक पटकाविला.

महिलांच्या गटात निर्वी कालकोप्पी प्रथम, अॅनेसिसा कारव्हालोने दुसरा तर श्रुती चौगुलेने तिसरा क्रमांक पटकाविला. 39 वर्षांवरील गटात पुरूष विभाग श्रीकांत बी. प्रथम, राजन कुसवाड दुसरा, भूषण सुयल तिसरा, महिला गटात नविता धायकोंडे प्रथम, पूजा रजपूत दुसरा, अनुराधा पोटे तिसरा, 40 ते 49 वयोगटात गटात पुरूष विनायक जांबोटकर प्रथम, संतोष शानभाग दुसरा, राहुल पोरवाल तिसरा, महिला गट निरा पुरोहित प्रथम, नुपूर वाटवे दुसरा, शिवानी अनगोळकर तिसरा, 50 वर्षांवरील गटात पुरूष रणजित कणबरकर प्रथम, कल्लाप्पा तिरवीर दुसरा, शिवप्रसाद ठाकुर तिसरा, महिला गट नलिनी पद्मनाभराव प्रथम. 31 ते 44 गटात महिला गट नेत्रा सुतार प्रथम, सानिया ताशिलदार दुसरा, कविता गणिगेर तिसरी, 45 वरील गट पुरूष परशराम कुगजी प्रथम, दिपक खटावकर दुसरा, अमन नदाफ तिसरा, महिला गट मयुरा शिवलकर प्रथम, निधी चौगुले दुसरा, सुषमा भट तिसरा.

Advertisement

5 किलोमीटर मुले विभाग 16 वर्षांखालील - मनीष दळवी प्रथम, अभिषेक दालविक दुसरा, आर्यन पाटील तिसरा, मुली विभाग क्रांती वेताळ प्रथम, सृष्टी पांचारिया दुसरा, अर्ना असुंडी तिसरा, 17 ते 34 गटात पुरूष सुरज तिकुटे प्रथम, अंकित कुमार दुसरा, अंकित कुमार तिसरा, महिला दिव्या हेरेकर प्रथम, स्नेहा भोसले दुसरा, समिक्षा वेताळ तिसरा, 35 ते 44 गट पुरूष बसवराज हुद्दार प्रथम, संगाप्पा पारसअप्पा दुसरा, भाऊसाहेब छत्तर तिसरा, महिला गट सपना चिटणीस प्रथम, मृणाल वाटवे दुसरा, स्नेहा वेर्णेकर तिसरा, 45 ते 54 पुरूष विनायक असुंडी प्रथम, विनय पाटील दुसरा, मोरबाली विला तिसरा, महिला रुपा निरंजन प्रथम, रेश्मा पोरवाल दुसरा, सुजाता गोणकर तिसरा. 55 वरील गटात यशवंत परब प्रथम, बाळाप्पा मण्णीकेरी दुसरा, यशोधर कोटीयन तिसरा, महिला राजेश्वरी बालोजी प्रथम, किती तांबे दुसरा. या विजेत्या स्पर्धकांना रोटरी क्लब वेणुग्रामचे अध्यक्ष संजीव देशपांडे, इव्हेंट चेअरमन लथेश पोरवाल, लोकेश होंगल, सोमनाथ कुडचीकर, जगदीश शिंदे, रोहन कदम, हर्षद देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके, प्रमाणपत्र, रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

Advertisement
Tags :

.