For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावकरांचा रयतेच्या राजाला मुजरा

12:30 PM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगावकरांचा रयतेच्या राजाला मुजरा
Advertisement

जल्लोषात शिवज्योतींचे आगमन : गल्लोगल्ली शिवमूर्तीच्या पूजनाने शिवजयंती उत्साहात साजरी : तरुणांकडून मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक : महिलांनी गायिला महाराजांचा पाळणा

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात परंपरेनुसार अक्षय्य तृतीयेला शिवजयंती साजरी होते. मंगळवारी मोठ्या जल्लोषात गल्लोगल्ली रयतेच्या राजाचे आगमन झाले. बेळगावमधील शिवजयंती उत्सव मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळाच्या वतीने  उत्साहात शिवजयंती साजरी झाली. यानिमित्ताने काही मंडळांनी जवळच्या किल्ल्यांवरून शिवज्योती आणल्या तर काही ठिकाणी पोवाडे तसेच मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

कंग्राळ गल्ली शिवजयंती मंडळ

Advertisement

कंग्राळ गल्ली येथील शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने परंपरेनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष सुहास चौगुले व अभिजीत अष्टेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. शरद पाटील यांच्या हस्ते वेताळ देवस्थानचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला शंकर बडवाण्णाचे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, बाबुराव कुट्रे, अशोक कंग्राळकर, रमेश मोरे, दौलत मोरे, अनंत पाटील, प्रकाश पाटील, अमित उसुलकर, बाबुराव इंगोले, दिगंबर काटकर, किरण बडवाण्णाचे, महादेव कंग्राळकर यांच्यासह इतर उपस्थित होते.

शिवजयंती उत्सव मंडळ, माळी गल्ली

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही माळी गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फौंडेशनच्या अध्यक्षा मीना बेनके, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, दीपा भोसले, तनुजा चिकेर्डे, विद्या लंगरकांडे, सुंदरा इताप्पे, मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, भाऊराव चौगुले, बसवराज नेसरगी, संकेत चिकोर्डे यांच्यासह इतर उपस्थित होते.

मंगाईनगर रहिवासी संघटना

वडगाव येथील मंगाईनगर रहिवासी संघाच्या वतीने मोठ्या थाटात मंगळवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. बाळकृष्ण व सुनील चव्हाण-पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर, श्रीधर बिर्जे, प्रशांत हणगोजी, आनंद गोंधळी, बाळू भोसले, विनायक एकबोटे यांच्यासह इतर उपस्थित होते.

कर्नाटक क्षत्रिय परिषद

कर्नाटक क्षत्रिय परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. महिला जिल्हाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत, कार्याध्यक्ष दिलीप पवार, डी. बी. पाटील, बसवराज मायगोटी, संजय भोसले, सतीश बाचीकर, रोहन कदम, चांगाप्पा पाटील, राहुल पवार, किरण कावळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भगवे वादळ युवक संघ, अनंतशयन गल्ली

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ भगवे वादळ युवक संघ, अनंतशयन गल्ली, यांच्या वतीने मंगळवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. पारगड येथून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवज्योत बेळगावमध्ये आणली. रेणुकादेवी मंदिर येथे शिवजन्म सोहळा संपन्न झाला. यावेळी चंद्र्रकांता माळी, मनोज तानवडे, मयुरेश माळी, रितेश माळी, सुरेश सुळे, दयानंद मुचंडी, परशराम माळी, रविंद्र ताशीलदार यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

अनगोळ नाका, टिळकवाडी

अनगोळ नाका टिळकवाडी येथील शिवप्रेमींच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. उद्योजक रमेश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. पाळणा गीत म्हणून महाआरती करण्यात आली. यावेळी जितेंद्र गुंडपन्नावर, समीर बेपारी, सुनील सारंग, महेश प्रधान, जगदीश पलंगे, गुरुनाथ पानकर, आप्पाजी बस्तवाडकर, समीर शेख यांच्यासह इतर उपस्थित होते.

संयुक्त शिवभक्त मंडळ, काकती

काकती येथील संयुक्त शिवभक्त मंडळाच्या वतीने सलग 30 व्या वर्षी शिवज्योत आणण्यात आली. 25 युवकांनी सहभाग घेऊन कोल्हापूर येथील गगनगिरी गडावरून शिवज्योत प्रज्वलित करून बेळगावमध्ये आणली. शिवज्योतीचे पूजन संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज चैतन्य महाराज देहूकर (पंढरपूर) यांच्या हस्ते झाले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, कोरे गल्ली शहापूर

कोरे गल्ली, शहापूर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी सकाळी राजहंसगड येथून शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष मोहन पाटील, पंच मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ कुंडेकर यांच्या हस्ते शिवमूर्तीला अभिषेक करण्यात आला. शांताराम मजुकर यांनी पौरोहित्य केले. सन्मित्र महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी महाराजांचा पाळणा गायिला. गंगापुरी भजनी मंडळाच्या सदस्यांनी पोवाडे गायिले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

धर्मवीर संभाजीनगर, वडगाव

मराठा गल्ली, धर्मवीर संभाजीनगर वडगाव येथील धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीधर जाधव, नारायण केसरकर, पांडुरंग मजुकर व इतर शिवप्रेमींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. महिलांनी पाळणा गायिला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमाला धर्मवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्ञानेश्वरनगर गाडेमार्ग, वडगाव येथे महाप्रसादाचे वितरण

ज्ञानेश्वरनगर, गाडेमार्ग, वडगाव येथील हिंदू एकता युवक मंडळातर्फे पारंपरिक शिवजयंतीनिमित्त महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी दोन हजारहून अधिक नागरिकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून महाप्रसादाला प्रारंभ झाला. मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.