For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-मिरज पॅसेंजरला 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

11:42 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव मिरज पॅसेंजरला 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
Advertisement

बेळगाव : बेळगाव-मिरज-बेळगाव पॅसेंजरला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने शनिवार दि. 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. बेळगाव जिल्ह्यात आलेल्या पूरस्थितीमुळे रस्ते वाहतूक ठप्प असल्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव-मिरज मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात पॅसेंजर सुरू केली आहे. 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या रेल्वेसेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही पॅसेंजर सांबरा, सुळेभावी, सुलधाळ, पाच्छापूर, पर्कनट्टी, गोकाक रोड, घटप्रभा, बागेवाडी, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द, शेडबाळ, विजयनगर या रेल्वेस्थानकांवर थांबते. नागरिकांनी असाच प्रतिसाद दिल्यास ही अनारक्षित एक्स्प्रेस कायम सुरू ठेवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.